‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बाथटबमधील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा फोटो

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर. काही दिवसांपूर्वीच मितालीने अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत लग्नगाठ बांधली. त्यामुळे मिताली सध्या चर्चेत आहे. परंतू आता लग्नासोबतच तिची आणखी एका कारणामुळे चर्चा रंगू लागली आहे.

मिताली आणि सिद्धार्थ चांदेकरच्या लग्नाला बराच कालावधी उलटून गेला असून अजूनही त्यांचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत असतात. यातच सध्या मितालीचे बाथटबमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

लग्नानंतर मिताली मायेकर आणि सिद्धार्थ चांदेकर लोणावळा येथे गेले होते. मितालीनं इन्स्टाग्राम अकांऊंटवर फोटो शेअर केलेले पहायला मिळाले. यादरम्यान बाथटबमध्ये इंजोय करत असतानाचा फोटो मितालीने शेअर केला आहे.

मितालीच्या या बोल्ट आणि हाॅट फोटोंनी सोशल मीडियीवरचं तापमान गरम झालेलं पहायला मिळालं. विशेष म्हणजे हा फोटो सिद्धार्थने काढला असून ‘बबली ब्लँकेट’, असं मितालीने याला कॅपशन दिलं आहे.

 

मितालीचा हा अंदाज पाहून चाहते नव्यानं तिच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. याआधी सुद्धा मितालीने मचान येथेच बाथटबमध्ये फोटोशूट केला होता. मात्र या फोटोंमध्ये तिने क्रीम कलरचा गाऊन परिधान केला होता.

दरम्यान, लग्नानंतर मितालीनं सोशल मीडियावर तिच्या नावात बदल केल्याचं पाहायला मिळालं. ‘मिताली मयेकर-चांदेकर’ अशा नावानं तिनं सोशल मीडियावरही नवी सुरुवात केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी: 1 मार्चपासून ‘या’ सर्वसामान्य लोकांना मिळणार मोफत कोरोना लस

आणखी एका स्टारकिडचं कलाविश्वात पदार्पण, झळकणार ‘या’ भूमिकेत

मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणी एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून दिलासा

….म्हणून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ – मुंबई महापालिका आयुक्त

आण्णा तुला गर्लफ्रेंड आहे का?, तरुणीच्या प्रश्नानी राहुल गांधी क्लिन बोर्ड