अजित पवारांच्या राजीनाम्याने कार्यकर्ते नाराज; ‘या’ नेत्याचाही राजीनामा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांच्या समर्थकांनीही राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी पदाचा राजीनामा दिला.

सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या सूडाच्या राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा देत आहोत, असं जावेद शेख यांनी म्हटलं आहे.

शेख यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे आता अजित पवारांचं समर्थन करण्यासाठी पक्षातील इतर नेते राजीनामा देण्यासाठी पुढे येत असल्याचं दिसत आहे.

अजित पवारांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी याबाबत खुलासा केला. ‘आज दुपारी बैठका सुरू असताना राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यांनी आमच्या कुणाशीही चर्चा केली नव्हती, असं शरद पवारांनी सांगितलं. 

मी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क केला तर त्यांनी दिलेलं कारण समजलं. शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी माझ्या नावाचा समावेश करण्यात आला. त्यामुळे अजित पवार हे अस्वस्थ होते. राज्यातील राजकारणाची पातळी खालावली आहे. यातून बाहेर पडावं असा सल्लाही त्यांनी आपल्या मुलाला दिला होता, असं शरद पवारांनी सांगितलं. 

महत्वाच्या बातम्या-