‘ही’ झाडं लावा आणि मच्छरांना पळवून लावा, वाचा जबरदस्त आयडिया

पाऊस गेल्यानंतरही मच्छरांचा त्रास काही कमी होत नाही. उलट ते अधिक वाढतात. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला थंडीच्या दिवसात डेंग्य़ूसारख्या आजाराच्या कचाट्यात घेऊ शकतो. त्यामुळे घरच्याघरी मच्छरांना पळवून लावण्याच्या काही टीप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. नैसर्गिक पद्धतीनं आपण डासांपासून मुक्ती मिळवू शकतो.

दिवसेंदिवस वाढणा‍‍र्‍या शहरीकरणामुळे सार्वजनिक अस्वच्छतेचे प्रमाण देखील वाढले आहे. परिणामी डासांची उत्त्पती वाढून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासरख्या जिवघेण्या आजारांचे प्रमाणही वाढले आहे. मग डासांना दूर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली केमिकलयुक्त उत्पादन वापरल्यास त्याचा उलट परिणाम मानवी शरिरावरच होतो. काही खास माॅस्किटो रिप्लियन्ट प्लांट्स घरी लावल्यानं डासांपासून सुटका मिळते.

घराभोवती असलेल्या झाडा-झुडपांमुळे डासांचे प्रमाण वाढत आहे तर हा चुकीचा समज आहे. घराभोवती योग्य झाडे लावल्यास डासांपासून तुमचे रक्षण होण्यास नक्कीच मदत होईल.

झेंडूचे झाड – झेंडूच्या फुलांचा सुवास शक्यतो कोणाला आवडत नाही. झेंडूची फुलं अब्जियोंजवळच उगवले जातात कारण ते एफिड्स आणि इतर किड्यांना दूर ठेवते. डासांना दूर ठेवण्यासाठी झेंडूचे झाड लावावे.

रोजमेरीचे झाड – रोजमेरी हेे झाड नैसर्गिकच माॅस्किटो रिप्लियन्ट आहे. रोजमेरी माॅस्किटो रिप्लियन्टचे चार थेंब आॅलिव्ह आॅईलमध्ये मिसळून लावावे.

तुळशीचे झाड –  अळ्या मारण्यास अत्यंत प्रभावी असल्याने डास दुर ठेवण्यास मदत करते. आयुर्वेदातसुद्धा खिडकीत किंवा घराजवळ तुळशीचे रोपटे लावणे हितकारक असल्याचे सांगितले आहे. यामुळे डासांची उत्त्पती कमी होते व त्यांचा घरातील प्रवेश रोखला जातो.

लॅवेंडरचे झाड – लॅवेंडरच्या अप्रतिम सुवासामुळे डासांचा दंश होण्यापासुन तुमचे रक्षण होते. लॅवेंडरचा उपयोग तुम्ही घरात रूम फ्रेशनर म्हणून देखील करू शकता किंवा त्याचे तेल तुम्ही अंगाला लावले तरीही तुमचे डासांपासून रक्षण होते.

गवती चहाचे झाड – गवती चहाच्या अर्कापासून तयार होणारे तेल डासांना दूर ठेवण्यात अत्यंत प्रभावी आहे. केमिकलयुक्त रॅपॅलंट पेक्षा गवतीचहाचा अर्क किंवा तेल वापरणे केव्हाही चांगलेच! याकरिता गवती चहाचा अर्क मेणबत्तीवर टाका किंवा त्याचे थेंब पाण्यात टाकून वाफ घ्या.

महत्वाच्या बातम्या – 

‘…बादशाह को बचाने में कितनो की जान…

जाणून घ्या! केशर खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

गुन्हेगाराकडून पोलिसाला बेदम मारहाण, कारण ऐकूण तुम्हालाही…

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री…

मास्क का घातला नाही? विचारताच महिलेनं केली पालिका…