मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा गैरवापर करत महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून अॅक्सिस बँकेत वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात फडणवीस आणि राज्य सरकारवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायलयात दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांची पत्नी अमृता फडवणीस या अॅक्सिस बँकमध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याने बँकेला झुकते माप देत राष्ट्रीय बँकांना तोटा होणारा हा निर्णय घेण्यात आल्याचं या याचिकाकार्त्याने म्हटलं आहे.
मोहनीष जबलपुरे यांनी मागील आठवड्यामध्ये मुंबई उच्च न्यायलायात मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्य सरकारविरोधात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकारने 11 मे 2017 रोजी एक परिपत्रक काढून राज्यातील पोलिसांची बँक खाती तसेच संजय गांधी निराधार आवास योजनेच्या लाभार्थ्यांची खाती खासगी बँकेमध्ये उघडण्यास सांगितल्याचं म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अॅक्सिस बँकेला मुद्दाम झुकते माप दिले. या निर्णयामुळे राष्ट्रीय बँकांना फटका बसला असून त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. या महिन्याच्या अखेरीसपर्यंत या याचिकेवर मुंबई उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारने जारी केलेल्या या परिपत्रकानुसार घेण्यात आलेले सर्व निर्णय रद्द करावेत. यासंदर्भात सरकारने घेतलेले सर्व निर्णय, परवाणग्या, करार रद्द करावेत, अशी मागणी जबलपुरे यांनी न्यायालयाकडे केली आहे.
दरम्यान, हा निर्णय घेताना अॅक्सिस बँक आणि राज्य सरकारमध्ये काय करार झाला आणि या निर्णयानंतर जेवढया पैशांची देवाणघेवाण झाली या सर्वांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी जबलपुरे यांनी न्यायलयाकडे केली आहे. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पूरग्रस्तांना दिलासा; सरकारकडून ‘या’ महत्वाच्या घोषणा
-पवारसाहेब, सोडून द्या! कावळेच ते!; ‘सामना’तून शरद पवारांवर टीका
-गिरीश महाजनला जोड्यानं हाणलं पाहिजे; धनंजय मुंडेंची एकेरी शब्दात टीका
-सहाय्यक पोलीस निरीक्षकाची पोलीस मुख्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या
-रवी शास्त्रींच्या निवडीवर कपिल देव म्हणतात…