तुमचा पोरगा तुमच्यासाठी राबतोय… त्याला निवडून द्या- धनंजय मुंडे

बीड | विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपलीये. परळी विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कारण बहिण-भावामधलं असलेलं हाडवैर आणि मागच्या वेळी पंकजांनी केलेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी धनंजय मुंडे आतुर झालेत. आज धनंजय मुंडेंनी भावनिक साद घालत परळीकरांना मतरूपी आशीर्वाद मागितला आहे.

तुमच्यातील पोरगा तुमच्यासाठी राबत असताना परळीची जनता म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभे रहा, अशी आर्त साद धनंजय मुंडेंनी परळीकरांना घातली आहे.

परळीच्या मातीतला माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, त्याचे दरडोई उत्पन्न दुप्पट व्हावे हे माझे स्वप्न आहे, असं धनंजय मुंडे यावेळी  म्हणाले.

परळीकरांना मला जर संधी दिली तर परळीचा चेहरामोहरा बदलून दाखवेन. तेवढी धमक माझ्यामध्ये आहे. फक्त तुमचे मतरूपी आशीर्वाद मला द्या, असं ते म्हणाले.

दरम्यान, याअगोदर देखील लेकीला तुम्ही आशीर्वाद दिलाय आता लेकाला आशीर्वाद द्या, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-