नवी दिल्ली | कोरोनाची अभूतपूर्व परिस्थिती हाताळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या नागरिकांना मदतीचं आवाहन केलं. पीएम केअर फंडामध्ये अनेक सेलिब्रेटीपासून, मध्यमवर्गीय लोकांनी, कोरोनायोद्ध्यांनी, अगदी 5 वर्षाच्या चिमुकल्याने ते भिकाऱ्यांनी देखील पैसे जमा केले. मात्र आरटीआय अंतर्गत विचारल्या गेलेल्या पीएम केअर फंडाबाबतच्या प्रश्नांना तसंच जमा झालेल्या पैशाचा हिशेब द्यायला पंतप्रधान कार्यालयाने नकार दिला आहे.
मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी पीएम केअर फंडाबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे माहिती मागवली होती. मात्र त्यांना ही माहिती देण्यात आली नाही. अगोदरच या फंडाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना आता पंतप्रधान कार्यालयाने उत्तर द्यायला नकार दिल्याने आता मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी या फंडाबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे चार प्रश्नांची उत्तरं मागितली होती. पीएम केअर फंडात रक्कम जमा केलेल्या टॉप 20 दात्यांची नावं काय ?….. पीएम केअर फंडात आतापर्यंत किती रक्कम जमा झाली ?….. पीएम केअर फंडातून खर्च केलेल्या रकमेचा तपशील किती आणि कोणता ?….. पीएम केअर फंडावर पंतप्रधानांनी नियुक्त केलेल्या 3 ट्रस्टींची नावं ?….
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने माहिती देण्यास नकार दिल्यानंतर आता विरोधक आणि सत्ताधारी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरूवात होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लोकांचा अंत सरकारने पाहू नये, वीस लाख कोटीच्या पॅकेजची पुनर्रचना करावी- प्रकाश आंबेडकर
-नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री रोरो बोटीतून आलिबागकडे रवाना
-पुणे जिल्ह्यातील पंचनामे लगोलग पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश
-उद्धव ठाकरेंनी नेतृत्व कसं करायचं असतं हे दाखवून दिलं- बाळासाहेब थोरात
-चक्रीवादळ आणि कोरोनाच्या संकटात मुंबईत घडले ‘देवदूता’चे दर्शन!