PM Kisan 16th Installment l देशभरातील करोडो शेतकऱ्यांना आज आनंदाची बातमी मिळणार आहे. कारण आज PM किसान सन्मान निधी (PM Kisan Scheme) योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये वर्ग करणार आहेत. गेल्या पाच वर्षांत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 11.8 कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. आतापर्यंत PM किसान सन्मान निधी योजनेद्वारे 2.81 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे 9 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याचा लाभ देणार आहेत. तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तुम्ही हा कार्यक्रम https://pmevents.ncog.gov.in/ वर थेट पाहू शकता.
PM Kisan 16th Installment l लाभ कोणाला मिळणार नाही?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये पाठवले जातात. ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. आज पंतप्रधान शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये ट्रान्सफर करणार आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ईकेवायसी केलेले नाही. तसेच अर्ज भरताना तुमचे नाव, वडिलांचे नाव, बँक खाते तपशील किंवा इतर कोणतीही चूक झाली असेल, तर पैसे तुमच्या खात्यात येतील की नाही हे तुम्हाला कळू शकेल.
PM Kisan 16th Installment l असे चेक करा PM किसान सन्मान निधी योजनेचे स्टेटस :
– प्रथमतः PM किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
– यानंतर होमपेजवरील संबंधित लिंकवर क्लिक करा आणि तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका.
– त्यानंतर कॅप्चा भरा आणि ‘गेट स्टेटस’ वर क्लिक करा.
– आता तुमच्या पेमेंटची स्थिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
PM किसान योजनेची माहिती मोबाईल ॲपवरून पाहू शकता :
– सर्व प्रथम Google Play Store किंवा Apple App Store वरून PM किसान मोबाईल ॲप डाउनलोड करा.
– यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका.
– आता OTP टाका आणि ‘लॉग इन’ वर क्लिक करा.
– त्यानंतर ‘लाभार्थी स्टेटस’ वर क्लिक करा.
– यानंतर तुमच्या पेमेंटची स्थिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
News Title : PM Kisan 16th Installment Relesed today
महत्त्वाच्या बातम्या-
तापसी पन्नू ‘या’ दिग्गज खेळाडू सोबत करणार लग्न
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी मोहाला बळी पडू नये
जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा?; राजेश टोपेंच्या ‘त्या’ वक्तव्याने एकच खळबळ
‘फेस काॅलवर काय काय बोलले…’; जरांगेंनी केला मोठा खुलासा!
मनोज जरांगेंना मोठा झटका; रुग्णालयातून सलाईन काढून जरांगे तातडीने अंतरवालीकडे रवाना, नेमकं काय घडलं?