शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही

PM Kisan Yojana | केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आणि त्यांचे भविष्य आर्थिक पातळीवर सुरक्षित करण्यासाठी विविध योजना राबवत आहेत. अशीच एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana). या योजनेअंतर्गत, भारत सरकार देशातील गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत करते. आज देशातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.

आतापर्यंत 18 हप्ते वितरीत-

या योजनेचे (PM Kisan Yojana) आतापर्यंत एकूण 18 हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. शेवटचा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात वितरीत करण्यात आला होता. आता केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या नियमावलीत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, योजनेचा १९ वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

नवीन नियमावली-

कुटुंबातील एकाच सदस्याला लाभ: केंद्र सरकारच्या नवीन नियमांनुसार, आता कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

आधार कार्ड (Aadhaar Card) अनिवार्य: योजनेसाठी अर्ज (Application) करताना पती (Husband), पत्नी (Wife) आणि मुलांचे (Children) आधार कार्ड देणे बंधनकारक (Mandatory) करण्यात आले आहे.

आयकर भरणारे अपात्र: नवीन नियमांनुसार, जे शेतकरी आयकर (Income Tax) भरतात त्यांना या योजनेतून अपात्र (Ineligible) ठरवण्यात आले आहे.

या योजनेच्या (PM Kisan Yojana) सुरुवातीला एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी अर्ज केले होते आणि त्यांना या योजनेचा लाभही मिळत होता. परंतु, नवीन नियमांमुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत.

News Title : pm kisan yojana changes in rules

महत्त्वाच्या बातम्या-

पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल करिना कपूरचं विधान चर्चेत!

लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर!, अदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती

बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय?, आणखी एक खंडणीचा धक्कादायक प्रकार समोर!

लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच एवढे रुपये जमा होणार! आदिती तटकरेंचा मोठा खुलासा

खूशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबद्दल केंद्र सरकारने घेतला