Top news देश

बिल गेट्स यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार, कारण…

नवी दिल्ली | गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेट्स यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी बिल गेट्स यांनी करोनाच्या संकटामुळे जागतिक स्तरावर पडणारा सामाजिक आणि आर्थिक ताण किमान राहिल यासंदर्भात उपाययोजना करतानाची भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनी मोदींचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिल गेट्स यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करोनाच्या समस्या आणि या आजाराशी लढण्याच्या उपाययोजना यावर चर्चा केली. तसंच यावेळी मोदी यांनी करोनाविरोधात भारतानं केलेल्या उपाययोजनांचीही त्यांना माहिती दिली.

भारत आपल्या सर्व नागरिकांच्या मदतीनं करोनाविरोधातील ही लढाई कठोरपणे लढत आहे. करोनाशी निगडित सर्व माहिती आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो आहोत. याचा लाभ जगभरातील अन्य देशही घेऊ शकतात. अशा कठीण परिस्थितीत कोणतेही पूर्वग्रह न ठेवता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं मोदींनी बिल यांना सांगितलं.

दरम्यान, भारताच्या भूमिकेमुळे लस निर्मिती, चाचणी आणि सर्वांपर्यंत उपचार पोहचण्यासाठी मार्ग सुखकर होईल, अशी अपेक्षा बिल यांनी व्यक्त केली.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला भरीव पॅकेज द्या; शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र

-20 लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे ‘पटापट’ केले की पट्टीचा अर्थतज्ज्ञही चाट पडावा- संजय राऊत

-“मेक इन आणि स्टार्ट अप इंडियाच्या जाहीरातबाजीवर कोट्यवधी खर्च केले तसं आत्मनिर्भरतेच्या बाबतीत घडू नये”

-“नटून थटून टीव्हीवर येण्यापूर्वी मजुरांचे हाल पाहा”

-…तर माझा भरोसा धरू नका; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा