नवी दिल्ली | पार्थ पवार यांच्या रूपाने पवार घराण्याला पराभवाचा धक्का देणारे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचं पंतप्रधान मोदींनी कौतुक केलं आहे.
पंतप्रधान कार्यालयात बोलावून बारणे यांचं मोदींनी खास अभिनंदन केलं आणि त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी झालेल्या भेटीत राज्यातील एकंदर परिस्थितीचा आढावा देखील मोदींनी घेतला.
तुम्हाला चांगली संधी मिळाली आहे, चांगलं काम करा, मतदारसंघातले प्रश्न मार्गी लावा, असं मोदी म्हणाल्याचं बारणेंनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते श्रीरंग बारणे आणि शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगला होता. या सामन्यात बारणेंनी बाजी मारली आणि पवार घराण्याचा पराभव करून इतिहास रचला.
मी पार्थ पवार यांचा नव्हे तर पवार घराण्याचा पराभव केला आहे, अशी खोचक प्रतिक्रिया बारणे यांनी दिली होती.
महत्वाच्या बातम्या-
-“राष्ट्रवादी शरद पवारांपुरती मर्यादित, तर अध्यक्ष नसलेल्या काँग्रेसची स्थिती हास्यास्पद”
-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार; ‘हा’ नेता भाजपच्या वाटेवर???
-“खासदार आझम खान यांचे शीर कापून संसदेवर लटकवा”
-“साहेबांच्या हृदयाचे किती तुकडे होत असतील याचा अहिरांनी विचार केला का?”
-इस्लाम धर्मात लग्न हे जन्मोजन्मीच नातं नाही तर ते केवळ कॉन्ट्रॅक्ट- असदुद्दीन ओवैसी