मुंबई | पंतप्रधानपद हे कार्यकारी मंडळातील सर्वोच्चपद आहे. देशाच्या जडणघडणीच्या दृष्टीकोणातून हे पंतप्रधानपद खूप महत्त्वाचं मानलं जातं. अशातच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल मुंबईच्या क्राईम ब्रँचमध्ये आला आहे. या फोनमुळे आता मुंबईच्या क्राईम ब्रँचमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सध्या या मेलचा तपास गुप्तचर यंत्रणेकडून करण्यात येत असल्याची माहिती आता हाती आली आहे. या कटाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचं ईमेल करणाऱ्यानं म्हटलं आहे.
पंतप्रधानांना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार आहेत आणि त्यांच्याकडे 20 किलो RDX असल्याचं देखील मेलमध्ये म्हटलं आहे. या धमकीमध्ये दहशतवाद्यांचा संबंध असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्याचबरोबर मोदींचे काही कार्यकर्म रद्द होण्याची किंवा पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या आधी देखील सप्टेंबर 2021 मध्ये पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर आता पुन्हा धमकी मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“शिवसेना-राष्ट्रवादीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाच्या अदलाबदलीची शक्यता”
Sharad Pawar: शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
मुख्यमंत्री ठाकरे गृहखात्यावर नाराज?, दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्टचं सांगितलं…
Video | गर्लफ्रेंड-बाॅयफ्रेंडचा भररस्त्यात राडा; डिलिव्हरी बॉय सोडवायला गेला अन् भलतंच घडलं…