मोदी निघालेत न्यूयॉर्कला पण खोडा घातलाय पाकिस्तानने!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी न्यूयॉर्कला जाणार आहेत. मात्र त्याला पाकिस्तानने मोडता घातला आहे.  

न्यूयॉर्कला जाताना मोदींचं विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाणार आहे. मात्र पाकिस्तानने परवानगी नाकारली आहे.

पंतप्रधान मोदींच्या विमानाला आम्ही आमच्या हवाई हद्दीचा वापर करू देणार नाही, असं पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरेशी यांनी भारतीय उच्चायुक्तांना कळवलं आहे.

27 सप्टेंबरला मोदी अमेरिकेला जात आहेत. त्यावेळी त्यांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जावं लागणार आहे. त्यासाठी पाकिस्ताकडे परवानगीसाठी भारताकडून रीतसर विनंती करण्यात आली आहे. मात्र पाकिस्तानने ती फेटाळली आहे.

दरम्यान, काश्मिरमधून 370 कलम हटवल्याने भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत. त्याचेच पडसाद उमटायला लागल्याच्या चर्चा आता व्हायला लागल्या आहेत. 

ANI चं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-