मोदींच्या भाषणाची सुरूवात मराठीतून मात्र मुख्यमंत्र्यांचं हिंदीत

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची समारोप सभा नाशिकमधील पंचवटीतील तपोवनात पार पडली. या सभेमध्ये भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रामदास आठवले, गिरिश महाजन, उदयनराजे भोसले यांच्याबरोबरच भाजपचे राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांचा सहभाग होता. 

मोदींनी या सभेत आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा बराचसा भाग हिंदीत होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणातील अनेक मुद्दे हिंदीमध्ये स्पष्ट केले.

फडणवीसांनी आपल्या भाषणामधून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात काय काय कामं केली याची माहिती दिली.

प्रभू श्री राम आणि सीता मातेच्या चरणस्पर्शाने पावन आणि आदिमाया आदिशक्ती महिषासुर मर्दिनी सप्तश्रृंगी मातेच्या निवासाने पवित्र अशा नाशिकच्या या पावन धर्मभूमीला माझा शत: शत: नमस्कार, अशी मराठमोळी सुरुवात मोदींनी आपल्या भाषणाला केली.

दरम्यान, भाषणामध्ये मोदींनी फडणवीस यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना फडणवीस हे ऊर्जावान मुख्यमंत्री असल्याचे मत व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या-