नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधत आज देशवासियांना संबोधित केलं. वेळ, स्थिती आणि व्यवस्था बदलली पण बुद्धांचा विचार आजही निरंतर आहे. बुद्ध हे केवळ नाव नसून मानवतेचा विचार आहे. बुद्धांची दया, करुण, समभाव आणि स्वीकार ही बुद्धांची चार सत्य देशाची प्रेरणास्थान आहेत, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.
बुद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने बुद्ध धर्मगुरूंच्यामध्ये येण्याचं भाग्य नेहमीच आनंददायी असतं. मात्र सध्याची स्थिती पाहता ते शक्य नाहीये. तरीदेखील व्हर्चुअल कम्युनिटीच्या माध्यमातून मी आपणाशी संवाद साधतोय यापेक्षा अधिक आनंद तो काय? असं म्हणत त्यांनी संपूर्ण देशआला बुद्ध पोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
बुद्ध कोणत्याही एका परिस्थितीत मर्यादित नाहीत, तो कोणत्याही एका विषयापुरता मर्यादित नाही. सिद्धार्थचा जन्म, सिद्धार्थ गौतम होण्याआधी आणि नंतरही काळाची चक्र अनेक शतकांपासून निरंतर चालू आहे, ज्यात बर्याच घटना, परिस्थिती यांचा समावेश आहे. परंतू वेळ, स्थिती आणि व्यवस्था बदलली पण बुद्धांचा विचार आजही निरंतर, असं ते म्हणाले.
प्रत्येक जीवनातील अडचणी दूर करण्याचा संदेश आणि संकल्प यांनी नेहमीच भारताच्या सभ्यतेला, संस्कृतीला दिशा दर्शविली आहे. भगवान बुद्धांनी भारताची ही संस्कृती आणखी समृद्ध केली आहे. ते स्वत: चा दिवा स्वत: बनले आणि आयुष्याच्या प्रवासात त्यांनी इतरांचेही जीवन प्रकाशमान केलं, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; फडणवीस राज ठाकरेंसह प्रमुख नेत्यांना केलं निमंत्रित
-फडणवीसांच्या शाहू महाराजांवरील त्या वादग्रस्त ट्विटवर; छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया
-…तर तुम्ही दारूच्या बाटल्या घरपोच पुरवण्याची सेवा सुरू करावी; राऊतांचा ‘राज’समर्थकांवर निशाणा
-मी आज जो काही आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच- नारायण राणे