गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमधील सुरत या ठिकाणी असलेल्या एका बेकरीने 700 फूट लांबीचा आणि 7 हजार किलोंचा केक तयार करण्यास सुरुवात केली आहे. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन करण्यासाठी सुरतमधल्या या बेकरीने ही तयारी सुरु केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याचं सुरत येथील ‘ब्रेडलाईनर बेकरी’ने ठरवलं आहे. त्यामुळे 7 हजार किलो वजनाचा आणि 700 फूट लांबीचा केक तयार करण्याची तयारी सुरु केली आहे.
सुरतमधील 700 लोकांकडून हा केक कापण्यात येईल असंही ब्रेडलाईनर बेकरीच्या मालकांनी सांगितलं. भ्रष्टाचारमुक्त भारत ही या केकची थीम आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सुरतमधल्या अतुल बेकरीने देखील 370 शाळांमध्ये अन्नाची 12 हजार पाकिटांचं वाटप करण्याचं ठरवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं अनुच्छेद 370 हटवलं त्यामुळेच 370 शाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नाची पाकिटं दिली जाणार असल्याचं कळतंय.
आपल्या देशाला कुपोषणाची समस्या भेडसावते त्या समस्येतून बाहेर पडण्याची एक सुरुवात म्हणून आणि या समस्येला तोंड देण्यासाठी ही पोषण आहाराची पाकिटं वाटण्यात येणार आहेत, असं अतुल बेकरीच्या मालकांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
आघाडीच्या 40च्या वर एकही जागा येणार नाही- गिरीश महाजन – https://t.co/l1wK2xEWys @girishdmahajan
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 17, 2019
इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा- बाळासाहेब थोरात- https://t.co/aH4tpCVnw1 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 17, 2019
स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब? – उद्धव ठाकरे- https://t.co/ttHl2IblHW @uddhavthackeray @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 17, 2019