ही लढाई दीर्घकाळ चालेल, पण आपल्याला थांबायचं नाही- नरेंद्र मोदी

मुंबई |करोनाशी दोन हात करताना सगळा देश एकवटला आहे. केंद्र सरकारने करोनाबाबत कठोर निर्णय घेतले आणि जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहोत. करोनाविरूद्धची लढाई दीर्घकाळ चालेल, पण आपल्याला थांबायचं नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

भाजपाचा आज चाळीसावा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने त्यांनी हा संवाद साधला. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला आहे. त्यासोबत  जनतेचेही त्यांनी आभार मानले आहेत.

प्रत्येकाचा एकच संकल्प असेल,कोरोनाच्या लढाईत कोरोना व्हायरसचा पराभव करत मानवतेचा विजय साकारणार आहोत. कार्यकर्त्यांनी कोणाच्याही मदतीला जाताना चेहऱ्यावर मास्क लावा. सध्या कपड्या-टॉवेलपासून मास्क बनवा, असंही मोदींनी सांगितलं.

काल रात्री गरीब-श्रीमंत, ग्रामीण-शहरी, साक्षर-निरक्षर अशा 130 कोटी जनतेने एकजूट दाखवली, आपण एकटे नसल्याची सामूहिक भावना दिवे लावताना दिसली असल्याचं मोदींनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

-तेव्हा विचारलं ‘गो कोरोना’ म्हणून जाईल का? अन् आता सगळेच म्हणतात गो कोरोना- रामदास आठवले

-मरकज प्रकरणावरून शरद पवार यांची नाव न घेता अमित शहांवर टीका

-फुले जयंतीला ज्ञानाचा तर बाबासाहेबांच्या जयंतीला संविधानाचा दिवा लावा- शरद पवार

-पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा शरद पवारांना फोन; तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

-“तबलिगीच्या कार्यक्रमामुळे देशात कोरोना संसर्गाचा वेग दुप्पट झाला”