मुंबई | दोन खासदारांचा पक्ष आज 300 खासदारांचा झाला हे कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ आहे ,असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओद्वारे आज भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आज भाजपचा चाळीसावा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने त्यांनी हा संवाद साधला.
कोरोनाशी दोन हात करताना सगळा देश एकवटला आहे. सगळ्या जगाने भारताच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. केंद्र सरकारने करोनाबाबत कठोर निर्णय घेतले आणि जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहोत. कोरोनाशी लढा देताना आपण गरीबीशी लढतो आहोत ही बाबही महत्त्वाची आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
कोरोनाशी दोन हात करताना भारताने केलेल्या प्रयत्नांचे WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कौतुक केलं आहे. करोनाविरोधात आपल्याला मोठी लढाई लढायची आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कालही अवघ्या देशाचं धैर्य पाहण्यास मिळालं असल्याचं मोदींनी सांगितलं.
काल रात्री गरीब-श्रीमंत, ग्रामीण-शहरी, साक्षर-निरक्षर अशा 130 कोटी जनतेने एकजूट दाखवली, आपण एकटे नसल्याची सामूहिक भावना दिवे लावताना दिसली असल्याचंही मोदींनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या-
-‘हे लोक सुधारणार तरी कधी?, म्हणत कुमार विश्वास यांनी फटाके फोडणाऱ्यांचा घेतला समाचार
-आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी तबलिकी समाजातील प्रमुख धर्मगुरुंना केलंय हे आवाहन
-“इस्लामपूरमधील चार रुग्ण कोरोनामुक्त; लॉकडाऊनचे पालन करणाऱ्या सांगलीकरांचे आभार”
-‘हल्दीराम’च्या मालकाचं निधन; कुटुंब अडकलं परदेशात
-ही लढाई दीर्घकाळ चालेल, पण आपल्याला थांबायचं नाही- नरेंद्र मोदी