प्रजासत्ताकदिनी काँग्रेसने पाठवलेली ‘ही’ खास भेट पंतप्रधान मोदींनी नाकारली!

नवी दिल्ली |  प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत काँग्रेसने पंतप्रधान मोदींना विशेष भेट पाठवली होती. मात्र काँग्रेसने पाठवलेली ही भेट पंतप्रधानांनी स्वीकारली नसल्याचा काँग्रेसने दावा केला आहे. देशाचं विभाजन करण्याच्या कामातून तुम्हाला वेळ मिळाला तर आम्ही तुम्हाला संविधानाची प्रत पाठवली आहे ती आवर्जुन वाचा, असं आशय लिहून काँग्रेसने संविधानाची प्रत मोदींना पाठवली होती.

काँग्रेसने अ‌ॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून मोदींना ही भेट पाठवली होती. यासंदर्भातला स्क्रिनशॉट काँग्रसने ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

26 जानेवारीच्या दुपारी 2. 30 ते 3 वाजण्याच्या सुमारास काँग्रेसने आणखी एक ट्वीट करत प्रिय पंतप्रधान मोदीजी, थोड्याच वेळात आम्ही पाठवलेली संविधानाची प्रत तुमच्यापर्यंत पोहचेल. देशाचं विभाजन करण्याच्या कामातून तुम्हाला वेळ मिळाला तर ती वाचा, असं ट्टीट करत काँग्रेसने मोदींना संविधान वाचण्याचं आवाहन केलं होतं.

 

दरम्यान, आज 27 तारखेच्या दुपारी पंतप्रधानांनी काँग्रेसची भेट नाकारल्याचं ट्वीट काँग्रेसने केलं आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-यापुढे मी मराठवाड्यात समाजसेवक म्हणून काम करणार- पंकजा मुंडे

-फडणवीसांशी बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून धक्काबुक्की!

-“जय मोदी चा नारा दिल्यास पाकिस्तानींना नागरिकत्वच काय तर पद्मश्रीसुद्धा मिळेल”

-“पंकजा मुंडेंचं निव्वळ नाटक चालू आहे… तुमच्या हातात सत्ता होती तेव्हा काय केलं?”

-“…अन् माझ्या डोक्यात ठिणगी पडली अन् मी ताबडतोब पवारसाहेबाचं घर गाठलं”