करोनाबाधित 75 शहरं लॉकडाऊन करा; मोदी सरकारचे राज्यांना आदेश

नवी दिल्ली | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. करोनाचा प्रादुर्भाव असलेली 75 शहरं पूर्णपणे लॉकडाऊन करा, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर देशभरातील जनता आज स्वतःच्या घरात आहे. प्रत्येक नागरिक आपापल्या घरातच राहिल्यास संसर्ग होण्याची साखळी रोखता येणं शक्य आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा सल्ला केंद्राने दिला.

महाराष्ट्रात नागपूर, मुंबई आणि पुण्यात अगोदरच अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत राजस्थानंतर आता पंजाब सरकारनेही मोठा निर्णय घेत संपूर्ण राज्यात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

-महाराष्ट्र लॉकडाऊन मात्र… ‘या’ गोष्टींची दुकाने चालू राहणार!

-“आज रात्री 12 वाजल्यापासून महाराष्ट्रात कलम 144 लागू “

-कोरनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय देशातली रेल्वेसेवा 31 मार्चपर्यंत बंद

-मोठी बातमी… मुंबईतली लोकलसेवा आज मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत बंद

-आपल्या पाळीव प्राण्यांचा त्याग करु नका, हर्षवर्धन पाटलांच्या लेकीचं आवाहन