औरंगाबाद ट्रेन अपघातामधील मृतांना पंतप्रधानांनी केली श्रद्धांजली अर्पण

औरंगाबाद | मालवाहू ट्रेनखाली चिरडून 14 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादजवळ घडली आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

महाराष्ट्रातल्या औरंगाबादच्या जवळच्या ट्रेन अपघातात 16 मजुरांच्या मृत्येने मी व्यथित झालो आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी मी याप्रकरणी बोललो आहे. ते या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत, असं मोदी म्हणाले आहेत. आवश्यक त्या सगळी मदत आणि सहकार्य दिले जात असल्याचंही मोदी यांनी सांगितलं आहे.

लॉकडाऊनमुळे जालन्यात अडकलेले मजूर रेल्वे रुळावरुन औरंगाबादच्या दिशेने पायी येत होते. रात्री थकल्यानंतर त्यांनी रूळावर आसरा घेतला. मात्र पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास मालवाहू ट्रेनने त्यांना जागीच चिरडलं. या दुर्घटनेत 16 जणांचा जागीच जीव गेला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, हे परप्रांतीय मजूर मध्य प्रदेशातील होते. म.प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच मृतांचे पार्थिव एका विशेष विमानाने मध्य प्रदेशात नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखाची मदत जाहीर

-खडसे, बावनकुळे, पंकजा मुंडें यांना भाजपचा पुन्हा दे धक्का; विधानपरिषदेची उमेदवारी नाही?

-आता दारु प्रेमींना मिळणार घरपोच दारु; झोमॅटो देणार होम डिलिव्हरी

-सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या ‘या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यक्षमतेवरच देवेंद्र फडणवीस यांचं प्रश्नचिन्ह