पीएमसी बँकेवर निर्बंध; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर सोन विकण्याची वेळ

मुंबई : रिझर्व्ह बँकेने ‘पंजाब अँड महाराष्ट्र’ बॅंकेला नोटीस पाठवून निर्बंध लावल्यावर अनेक ग्राहकांना आर्थिक अडचणींना सामोर जाव लागत आहे. टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकार हिच्यावरही बिकट आर्थिक परिस्थिती ओढावली आहे. 

आयुष्यभराची संपत्ती मी या बँकेत जमा केली होती. कठीण प्रसंगात आपल्यावर 50 हजार रुपयांचं कर्ज झाल्याचं तिने माध्यमांना सांगितलं. रोजच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला सोन्याचे दागिने विकावे लागले, असं नुपूरने सांगितलं आहे.  मरा

पीएमसी बँकेने ग्राहकांना एसएमएस पाठवून निर्बंधांविषयी माहिती दिल्यानंतर पीएमसी बँकेतून पैसे काढण्यासाठी शाखांबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. सहा महिन्यांपर्यंत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत.ग्राहक आपल्या खात्यातून सहा महिन्यांत केवळ 25 हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढू शकतात. 

नुपूरही ‘अगले जनम मोहे बिटिया ही किजो’ या हिंदी मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचली होती. 24 सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पीएमसी बँकेला नोटीस जारी केली.

सुरूवातीला आरबीआयने बॅंकेतील खातादारांना महिन्यातून खातेदारांना फक्त 1 हजार रूपये काढता येणार असल्याचं सांगितलं होत. पण खातेदारांनी या निर्णयाबाबतीतचा असंतोष पाहता ही मर्यादा वाढवून 6 महिन्यात 10 हजारांपर्यंत नेण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-