पुणे महाराष्ट्र

….हा धक्कादायक प्रकार पाहून मुख्यमंत्र्यांनाही लाज वाटली असेल!

पुणे : लोकांचा पैसा कसा पाण्यात जातो? याचं उदाहरण नुकतंच पुण्यात पहायला मिळालं. मोठा गाजावाजा करुन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते महापालिकेच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु असतानाच याच पालिकेतील सभागृह गळत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला.

महापालिकेच्या विस्तारित इमारतीवर तब्बल 50 कोटी रुपये खर्च करण्यात आला. याआधी इमारतीच्या उद्घाटनाचे तीन मुहूर्त हुकले, मात्र पळापळ करुन सत्ताधारी भाजपने हा मुहूर्त साधला. उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 

गळत असलेल्या जागेवर पेपर टाकून ही गळती लपवण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो फोल ठरला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्यानं सत्ताधाऱ्यांची नाचक्की झाली तर विरोधकांच्या हाती मात्र मोठा मुद्दा मिळाला आहे.

दरम्यान, सत्ताधारी भाजपने याप्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप स्वतः महापौर मुक्ता टिळक यांनी फेटाळला आहे. गच्चीवर कचरा साठला म्हणून पाणी गळालं, असं मुक्ता टिळक यांनी सागितलं.

IMPIMP