पुणे | पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या 2100 चालक, वाहक आणि अन्य बदली कामगारांना एप्रिल महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांपुढे ऐन कोरोनाच्या संकटात आर्थिक संकट आ वासून उभे आहे.
लॉकडाऊच्या पार्श्वभूमीवर गेली दीड ते दोन महिने पीएमपीची प्रवासी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पीएमपीला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी, खर्च बचत आणि उत्पन्न वाढ यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पीएमपीच्या ताफ्यात 2100 कर्मचारी रोजंदारीवर काम करतात. या कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन दरम्यान ते आजच्या दिवसाला देखील काम देण्यात आलेले नाही. काम न दिल्याने पीएमपी प्रशासनाने त्या कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन दिलेले नाही.
सध्याच्या परिस्थितीत रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन देण्यात आले आहे. मात्र, एप्रिल महिन्यात त्यांचे वेतन देण्यात आलेले नाही, तसंच याबाबत कामगार आयुक्तांकडून मार्गदर्शन मागितलेले आहे, अशी माहिती पीएमपीचे सहव्यवस्थाकीय संचालक अजय चारठाणकर यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राज्यात विमानसेवा सुरू होणार का?, गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मोठं वक्तव्य
-राज्यात 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा विचार; शिक्षणमंत्र्यांचे संकेत
-लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले 19 हजार 100 कोटी रूपये…!
-निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही- रोहित पवार