Top news आरोग्य

पोहे ‘या’ कारणांसाठी असतात लाभदायक; सविस्तर जाणून घ्या

पुणे | सकाळचा नाष्टा म्हटलं की सर्वात पहिला पर्याय सुचतो तो कांदेपोह्यांचा. बऱ्याच वेळा घरातील स्त्रिया सकाळच्या नाष्ट्याला कांदेपोहे बनवत असतात. अर्थातच कांदेपोहे पचायला हलके आणि पोटभरसुद्धा भरतं. त्यामुळेच नाष्ट्यासाठी याला पहिली पसंती असते. पण हेच पोहे आरोग्यासाठी किती लाभदायक असतात हे आज जाणून घेऊयात.

पोह्यांमध्ये कॅलरीची मात्रा कमी असते. कॅलरी कमी असल्यामुळे पोह्ये खाल्ल्याने वजन वाढत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पोहे खाणं फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, आयर्नस पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, सी आणि डी यांचंही प्रमाण उत्तम असतं.

सकाळच्या नाष्ट्याला जर पोहे खालले तर शरीरातील काम करण्यासाठी ऊर्जा वाढते. तसेच दिवसभरात येणारा कामाचा ताण कमी होतो. यामुळे जर तुम्हाला दिवसभर काम केल्याने प्रचंड थकवा जाणत असेल तर सकाळी पोहे खाणं तुम्हाला नक्कीच फायद्याचं ठरेल.

दरम्यान, पोह्यांचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे पोह्यांमुळे शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रणात येतो. त्याचप्रमाणे पचनक्रिया देखील सुरळीत चालते.

महत्वाच्या बातम्या-

वयाने लहान असलेल्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करून घेत नाही ना?- संजय राऊत

भारताच्या राजकारणाच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला ‘हा’ मोठा विक्रम; जाणून घ्या!

दारूची दुकान उघडली पण जिम अजूनही बंद हे दुर्दैवी; फडणवीसांचा राज ठाकरेंच्या सूरात सूर

अधिकारी बदल्यांच्या नावाखाली महाविकासआघाडीच्या मंत्र्यांची कमाई, सीआयडी चौकशी करा; पाटलांचा गंभीर आरोप

पार्थ पवार सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल, पवारांचीही भेट घेण्याची शक्यता!