“…म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवलं”

मुंबई | 2014 साली देशात सत्ताबदल झाला. 10 वर्षापासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला मात देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शप्पत घेतली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

1972 ला मी आठवीत होतो. त्यावेळी लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी इंदिरा गांधी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांनी नारा दिला होता, की मी जर निवडून आले तर या देशातील गरिबी हटवून टाकेल, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

मी निवडून आले तर गरिबी हटवणार, असा नारा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिला होता, मात्र त्यांच्या काळात गरिबी हटली नाही. निवडणुकीत ज्याने त्याने इंदिरा गांधींना मतदान केलं. मात्र गरिबी हटली नाही, असंही रावसाहेब दानवे म्हणाले.

नरेंद्र मोदी श्रीमंत आहे का? नाही. नरेंद्र मोदी यांचे वडिल गुजरातमध्ये चहा विकायचे आणि नरेंद्र मोदी डब्या डब्यात चहा चहा चहा म्हणत विकायचे. त्यानंतर आता 2014 साली भाजप सत्तेत आलं, असंही दानवे म्हणाले.

लोकांना माहिती होतं. जोपर्यंत या देशाचा पंतप्रधान गरीब असणार नाही, तोपर्यंत गरिबी हटणार नाही. ही गरिबी नरेंद्र मोदी यांच्यामुळे हटणार, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

देशातल्या जनतेनं ठरवलं, की देशाचा पंतप्रधान गरीबच झाला पाहिजे. म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवलं, असंही रावसाहेब दानवे म्हणाले.

दरम्यान, नरेंद्र मोदी जास्त भावात दुसऱ्याकडून राशन खरेदी करतात आणि गरिबांना स्वस्त भावामध्ये विकतात. त्याचबरोबर गरिबांसाठी मोदींनी राशनची चांगली व्यवस्था केली, असंही ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

कोरोनाचा हाहाकार! ‘या’ राज्यात उद्यापासून शाळा-काॅलेज बंद, नाईट कर्फ्यू लागू

तज्ज्ञ म्हणतात, ‘ओमिक्राॅनमुळे फायदाच होणार’; कसं ते वाचा सविस्तर

रवी गोडसे म्हणतात, “ओमिक्राॅन ही वाईट बातमी पण…”

Sulli डील, Bulli डील- नेमका हा प्रकार आहे तरी काय?

पिकअपचा चक्काचूर!, असा अपघात की हलक्या काळजाच्या लोकांनी वाचू नये