“गजा मारणेचंही स्वागत झालं होतं, मग तो काही आदर्श पुरूष आहे का?”

मुंबई | सक्तवसूली संचनालयाकडून शिवसेना नेते संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आल्यानंतर राज्यात मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे.

ईडीकडून राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आल्यानंतर भाजपकडून जोरदार टीका होत आहे. या टीकेला उत्तर देताना राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचार केल्याचं वक्तव्य केलं होतं.

किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावावर लोकांकडून पैसे गोळा केले आणि आपल्या कामासाठी वापरल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

संजय राऊतांची संपत्ती जप्त झाली तेव्हा राऊत दिल्लीत होते. राऊत यांनी दिल्लीतून मोदी सरकारवर हल्ला चढवला होता. त्यानंतर ते आता मुंबईत दाखल झाले आहेत.

राऊत यांचं मुंबई विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी विमानतळ परिसरात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.

राऊत यांच्या स्वागतावर भाजप नेत्यांनी जहरी टीका केली आहे. अर्वाच्य भाषेत शिव्या देता, कोण आहेत संजय राऊत, बेशरपणा आणि नंगानाच याचा कळस झालाय, संजय राऊतांनी हे बंद करावं, असं भातखळकर म्हणाले आहेत.

पुण्यात गजा मारणे नावाचा गुंड होता. तो काही आदर्श पुरूष आहे का?, तो सुटला तेव्हा त्याचं देखील जंगी स्वागत झालं. प्रत्येकानं आपल्या कुटुंबीयांना सांगायचं तु गजा मारणे हो हे सांगण्यासारखं हे प्रकरण आहे, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राऊत यांच्यावर केली आहे.

दरम्यान, भाजप नेत्यांच्या टीकेवर आता संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय राऊतांनी आता केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात खुली आघाडी उघडली आहे हे मात्र नक्की.

महत्त्वाच्या बातम्या –

“कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा??, कारवाई झाली की बोंबलायचं अन्…”

ढोल ताशाच्या गजरात संजय राऊतांचं मुंबईत जंगी स्वागत, म्हणाले…

नितेश राणेंच्या अडचणी वाढणार?; पोलिसांनी मोठं पाऊल उचललं

 “गेल्या 27 वर्षांपासून मी…”, पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरे भावूक

 मोठी बातमी ! वसंत मोरेंना मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन हटवलं