महाराष्ट्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग

पोलादपूर बस अपघाताचे 13 हृदयद्रावक फोटो… हलक्या काळजाच्या व्यक्तीने शेवटचा फोटो पाहू नये

रायगड : पोलादपूरमधील आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी या बसने महाबळेश्वरला पिकनिकसाठी चालले होते. आंबेनळी घाटात आल्यावर ही बस 800 फूट खोल दरीत कोसळली. बसचा चुराडा झाला असून मृतदेह छिन्नविछिन्न झाले आहेत. 

दरम्यान, या अपघातातून प्रकाश सावंत-देसाई नावाचे कर्मचारी आश्चर्यकारकरित्या वाचले आहेत. त्यांनी दरीतून वर येऊन विद्यापीठाला फोन करुन या दुर्घटनेची माहिती दिली. 

पोलादपूर बस दुर्घटनेतून 34 पैकी फक्त प्रकाश सावंत-देसाई वाचले आहेत. 800 फूट दरीतून वर आल्यानंतर फोनला रेंज आली, त्यानंतर त्यांनी विद्यापीठाला अपघाताची माहिती दिली. 

घटनेची माहिती मिळताच विद्यापीठाने पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांना अपघाताचं ठिकाण शोधण्यास वेळ लागला. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं. 

पोलादपूर बस दुर्घटनेचे फोटो-

 

 

 

 

 

 

 

 

 

 

IMPIMP