राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला ‘या’ अटींवर पोलिसांची परवानगी

पुणे | स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रविवारी सकाळी दहा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

सभेसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी फलक लावून वातावरण निर्मिती केली आहे. मनसेकडून सभेची जोरदार तयारी करण्यात आलीये.

या सभेला पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पोलिसांकडून रविवारी सकाळपासून स्वारगेट परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

ठाकरे यांनी धार्मिक भावना दुखावणारी तसेच चिथावणीखोर वक्तव्ये करू नयेत. घोषणाबाजी करू नये तसेच सभेला येणाऱ्यांनी सभेला येताना किंवा सभा संपल्यानंतर वाहन फेऱ्या काढू नयेत

कार्यक्रमादरम्यान कोणतीही शस्त्रे, तलवारी आणि स्फोटक साहित्य आणू नये. लाऊडस्पीकरच्या वापरामुळे ध्वनी प्रदूषण नियमांचं उल्लंघन होता कामा नये, असंही आदेशात म्हटलं आहे.

मनसे प्रमुखांनी 5 जूनला अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. मात्र त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर रविवारी पुण्यात होणाऱ्या मेळाव्यात ते अयोध्या दौऱ्याची नवी तारीख जाहीर करतील अशी शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

झपाट्याने पसरणाऱ्या मंकीपॉक्सने सर्वांचं टेंशन वाढवलं, धक्कादायक माहिती समोर 

“श्रीकृष्णरूपी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने कंस मामाला गाडणार” 

केतकी चितळेवर शेजाऱ्यांचे अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…

‘गांXX दम असेल तर मला उचलून दाखवा’; प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली

जाहीरातदार बीसीसीआयवर भडकले, जाणून घ्या काय आहे प्रकरण