पांडुरंग समजून पोलिसाचे पाय धरणारा वारकरी; सोशल मीडियावर व्हीडिओ तुफान व्हायरल

पंढरपूर | ‘मला माझा विठ्ठल त्या पोलिसामध्ये दिसला’… देव कोठेही दिसू शकतो, मग तो दगडात दिसेल किंवा माणसाच्या रूपात तुमच्या समोर येऊन उभा ठाकेल. नुकतंच पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जात असताना एका वारकऱ्याने पोलिसामध्ये विठ्ठल दिसला म्हणून त्याचे पाय धरले आहेत. सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रंचंड व्हायरल होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीची यात्रा रद्द कऱण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत गर्दी होऊ नये यासाठी पंढरपूरात नाकाबंदी करण्यात आली आहे. मात्र एका वारकऱ्याला पंढरपूरला जात असताना पोलिसांनी अडवलं.

यावर वारकरी म्हणाला, तुम्ही तर मला पांडुरंगासारखेच भेटलात. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला त्याप्रमाणे आज तुम्ही माझ्यासमोर विठ्ठलाप्रमाणे उभे आहात. त्यामुळे मला माझा विठ्ठल भेटला, असं म्हणत त्या वारकऱ्याने पोलिसांचे पाय धरले.

वारकऱ्याला पाय धरताना पाहून ते पोलिसही गहिवरले. त्यांनी देखील वारकऱ्याला नमस्कार करत पुन्हा घरी जाण्याची विनंती केली. पोलिसांचा शब्द पाळत त्या वारकऱ्यानेही पुन्हा घरचा रस्त धरला.

https://www.facebook.com/SambhajiRajeTheGreatMaratha/videos/193271112084621/

महत्वाच्या बातम्या-

-आपल्या मुलांसाठी देश लुटायला कोणतीही कसर सोडली नाही, स्मृती इराणींचा सोनियांवर हल्लाबोल

-…म्हणून नागपुर, मालेगाव आणि धारावीतला कोरोना आटोक्यात, राजेश टोपेंचा महत्त्वाचा खुलासा

-गुन्हे सिद्ध करण्यात लॅबचे महत्वपूर्ण योगदान, गृहमंत्री अनिल देशमुखांचे कौतुकोद्गार

-कोरोनाच्या काळात पोलिसांनी शासनाची प्रतिमा उंचावली- गृहमंत्री अनिल देशमुख

-चंद्रकांत पाटलांना पहिल्यांदा चंपा कुणी म्हटलं? अनिल गोटेंनी जाहीर केलं ‘त्यांचं’ नाव