Top news कोरोना

लाॅकडाऊनमध्ये मोकाट फिरणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल, पाहा व्हिडीओ

Photo Credit - Bhagwat Prasad Pandey Daroga Ji / YouTube

नवी दिल्ली| संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे.

अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. सरकारने नागरिकांना नियमांंचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांनी याबाबत कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जे लोक घराबाहेर जातात, त्यांना शिक्षा दिली जात आहे.

अशातच दोन तरुणांनी लाॅकडाऊनच्या नियमांचं उलंघन केलेलं पहायला मिळालं. या तरुणांना पोलीस अधिकाऱ्यांनी अनोखी शिक्षा दिली. सोशल मीडियावर सध्या याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

नियमांचं उलंघन करणाऱ्या दोन तरुणांना पोलीस अधिकारी भगवत प्रसाद पांडे यांनी आपल्या अनोख्या अंदाजात शिक्षा देत त्यांच्याकडून संपूर्ण वहीभर ‘घरात राहा, सुरक्षित राहा’ असं लिहायला सांगितलं.

तरुणांनी 4 तासांपर्यंत 44 पानांच्या वहीत ‘घरात राहा, सुरक्षित राहा’ असं लिहून काढलं आहे. कोरोनाचा कर्फ्यू तोडण्याची शिक्षा तरुणांना अशा प्रकारे देण्यात आली आहे.

आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनाही याचं कौतुक केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, विनाकारण घराबाहेर फिरण्यापेक्षा घरात बसून थोडा फार अभ्यास करावा. लोकांना हा व्हिडिओ आवडला असून ट्विटरवरही हा व्हिडिओ प्रसिद्ध होत आहे.

हा व्हिडिओ त्यांनी 30 एप्रिल रोजी यूट्यूबवर शेअर केला होता, ज्याला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

दरम्यान, सध्या वेळ कठिण आहे, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनालाही मदत केली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे हीच काळाची गरज बनली आहे. कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत असे म्हणत अनेक लोक कोरोना काळात मदत करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

दबा धरून बसलेल्या बिबट्याने रस्ता पार करत असलेल्या हरणावर…

पोटासाठी वणवण! भूक भागवण्यासाठी तरुण रस्त्यावर सांडलेलं दूध…

कोरोना पॉझिटिव्ह असल्यास कोणते पदार्थ खावे? याबद्दल केंद्रीय…

रेल्वे स्थानकावरचा महिला पोलिसांचा भन्नाट डान्स होतोय सोशल…

कोरोनापासून वाचण्यासाठी महिलेनं शोधून काढला भयंकर उपाय,…

IMPIMP