अनुराग कश्यपला अट.क होणार? तब्बल 8 तास चौकशी करत पोलिसांनी अनुरागला…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीची पडद्याआड लपलेली काळी बाजू हळूहळू समोर येवू लागली आहे. नुकतंच अभिनेत्री पायल घोषनं दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लै.गिं.क छ.ळाचा आ.रोप केला आहे. पायल घोषनं इंडस्ट्रीतील एका मोठ्या दिग्दर्शकावर केलेल्या आ.रोपानंतर इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पायल घोषनं 22 सप्टेंबर रोजी वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग काश्यप विरुद्ध दखलपात्र गु.न्हा दाखल केला होता. पायलनं गु.न्हा दाखल केल्यानंतर वर्सोवा पोलिसांनी अनुरागला समन्स बजावत 1 ऑक्टोबरला वर्सोवा पोलीस ठाण्यात त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं.

1 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजताच्या सुमारास अनुराग कश्यप वर्सोवा पोलीस ठाण्यात हजर झाला होता. यानंतर पोलिसांनी तब्बल 8 तास त्याची चौकशी केली. रात्री साडेसातच्या सुमारास अनुराग कश्यप पोलीस ठाण्यातून बाहेर पडला. पायलनं अनुराग कश्यपवर 2014 मध्ये लैं.गिक छ.ळ केल्याचा आ.रोप केला आहे.

अनुराग कश्यप याला लवकरात लवकर अ.टक केली जावी अशी मागणी पायल घोषचे वकील नितीन सातपुते यांनी केली आहे. यामुळे आता याप्रकरणी पुढे काय घडतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच पायलनं वाय प्लस सुरक्षा मिळावी यासाठी सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची देखील भेट घेतली होती.

अनुराग कश्यप माझ्यासमोर न्यू.ड झाले होते, असं म्हणत पायलनं अनुरागवर अनेक गं.भीर आ.रोप केले आहेत. 22 सप्टेंबरला अनुराग विरोधात पायलनं एफ.आय.आर. दाखल करूनही पोलिसांनी अनुराग विरुद्ध कोणतीच कारवाई केली नव्हती यामुळे पायल 27 सप्टेंबरला पुन्हा वर्सोवा पोलीस ठाण्यात गेली होती.

दरम्यान, जर पोलिसांनी अनुराग विरोधात का.रवाई केली नाही तर मी उपोषण करेल, असा इशारा पायलनं यावेळी दिला होता. पोलीस स्टेशन बाहेर पायलनं प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता.

अनुराग कश्यप एक प्रभावशाली व्यक्ती आहेत. यामुळे अनुराग विरुध्द प्राथमिक त.क्रार दाखल केल्यानंतरही वर्सोवा पोलिसांनी अद्याप त्याला अ.टक केलं नाही. जर मला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर मी उ.पोषण करणार आहे, असं पायलनं प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.

तसेच रविवारी पोलीस स्टेशनमध्ये पायल घोष बरोबर तिचे वकील नितीन सातपुते सुद्धा आले होते. पोलिसांनी पायलनं दाखल केलेल्या त.क्रारीची दखल घ्यावी. पोलिसांनी तपासात वेग आणत अनुराग कश्यपवर लवकरात लवकर का.रवाई करावी, अशी मागणी सातपुते यांनी यावेळी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत केसमध्ये खरंच अरबाज खानला अटक केलंय का?, जाणून घ्या काय आहे सत्य

ड्र.ग्ज काय आहे?, अभिषेक बच्चनच्या उत्तराने चाहते झाले हैराण

“सुशांतच्या मृ.त्युच्या आदल्या दिवशी रिया सुशांतला भेटली होती!”

रियाचा 10 वर्षे तुरुं.गवास अटळ? रियाच्या घरी एनसीबीला सापडली ‘ही’ धक्कादायक गोष्ट!

एका माशानं तिला केलं लखपती; मिळालेली रक्कम ऐकून हैराण व्हाल!