देेवेंद्र फडणवीसांच्या काळात राज्यातील जातीय तणावात वाढ!

मुंबई |  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यातील जातीय तणावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचा अहवाल पोलिस खात्याने निवडणूक आयोगासमोर सादर केला आहे. याअगोदर हिंदू-मुस्लिम तणावाची सातत्याने चर्चा केली जायची. मात्र त्या तणावाची जागा आता सवर्ण-अनुसूचित जातींमधल्या तणावाने घेतली असल्याचं देखील अहवालामध्ये म्हटलं आहे.

केंद्रिय निवडणूक आयोगाने बुधवारी मुंबईत राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी पोलिस खात्याने निवडणूक आयोगासमोर हा अहवाल मांडला आहे.

राज्यातील 8 जिल्हे हिंदू-मुस्लिम धर्मीय तणावासाठी संवेदनशील म्हणून निवडले आहेत. तर सवर्ण आणि अनुसूचित जातींमधल्या तणावासाठी 14 संवेदनशील जिल्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, नगर, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये हिंदू-मुस्लिम तणाव सातत्याने निदर्शनास येतो. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर मराठवाड्यातील लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे या जिह्यांत सवर्ण आणि अनुसूचित जातींमध्ये तणाव असतो, असं चित्र आहे.

दरम्यान, फडणवीसांच्या कार्यकाळात राज्यातील जातीय तणावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा अहवाल सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-