राजस्थानच्या राजकारणात मोठी घडामोड; सर्व मंत्र्यांचे राजीनामे अन् मुख्यमंत्री…

नवी दिल्ली | एकेकाळी समग्र भारतावर राजकीय वर्चस्व असणारा काॅंग्रेस पक्ष (Congress) सध्या मोजक्याच राज्यात सत्तेत आहे. त्यातही पक्षाला अंतर्गत बंडाळीला सामोरं जावं लागत आहे. (Big developments in Rajasthan politics)

सध्या काॅंग्रेसपक्ष पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यात एकहाती सत्तेत आहे. या तीन राज्यात काॅंग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे.

काॅंग्रेस पक्षाला मिळालेलं यश मध्य प्रदेश राज्यात टिकवता आलं नव्हतं. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पक्षांतरामुळे काॅंग्रेसला मध्य प्रदेशची सत्ता गमवावी लागली होती.

अगदी तशीच परिस्थिती काही महिन्यांपूर्वी राजस्थानमध्ये उद्भवली होती. पण राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांना पक्षांतर करण्यापासून पक्षानं रोखलं होतं.

गेल्या एका वर्षापासून सचिन पायलट राजकीय पुनर्वसनाच्या आशेवर बसले होते. अशातच आता राजस्थानच्या सर्व मंत्र्यांनी आपले राजीनामे दिल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे आता सचिन पायटल मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय हालचालींनी वेग घेतला होता. सचिन पायलट अनेकदा दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटून आले होते. परिणामी या मंत्र्यांच्या राजीनाम्यांमागं सचिन पायलट गटाचा हात असल्याची चर्चा होत आहे.

गेल्या काही वर्षापासून राजस्थान काॅंग्रेसमध्ये सचिन पायलट आणि राजस्थानचे विद्य़मान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यात मोठा राजकीय संघर्ष चालू आहे.

राजस्थानमध्ये सत्तांतर घडवून आणण्यात तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांचा मोठा हात होता. पण सत्ता स्थापन करण्याची वेळ येताच मुख्यमंत्री म्हणून अशोक गहलोत यांना पसंती देण्यात आली.

अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानं आता नवीन मंत्रीमंडळ स्थापन होणार आहे. परिणामी सचिन पायलट गटाच्या आमदारांचा समावेश या नवीन मंत्रीमंडळात होण्याची शक्यता वाढली आहे.

दरम्यान, येणाऱ्या काळात राजस्थानमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात समन्वय राखण्यासाठी काॅंग्रेसला मोठा संघर्ष करावा लागणार हे मात्र नक्की आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 शरद पवार खोटं बोलले, देवेंद्र फडणवीसांनी शेअर केला व्हिडीओ

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्याची शक्यता; ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

खट्टी मीठी यारी! तीन पक्षातील तीन दिग्गज नेत्यांचा एकाच सोफ्यावर बसून हास्यकल्लोळ

“आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला”