‘राजकारण्यांमुळे आपल्याला ऑक्सिजन आणि बेडसाठी भटकावे लागते’ ‘या’ अभिनेत्यानं व्यक्त केला संताप

मुंबई| कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. अशा संकट काळात अनेक लोक पुढे येत सढळ हातानं मदत करत आहेत.

दिवसागणिक आरोग्य सुविधा अपु-या पडू लागल्या आहेत. ऑक्सिजन नाही, रूग्णालयात बेड्स नाहीत, औषधे नाहीत अशा स्थितीत सामान्यजन हवालदिल झाले आहे. अनेकांनी या स्थितीसाठी राजकारण्यांना जबाबदार ठरवत संताप व्यक्त केला आहे. आता बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टीनेही राजकारण्यांवर संताप व्यक्त केला आहे.

“जे राजकारणी खुर्चीवर बसतात ते फक्त पुढील पाच वर्षे पैसे कसे कमवायचे याचा विचार करतात. सिस्टमसाठी काय केले पाहिजे याचा विचार ते करतं नाही. त्यात आता एकमेकांवर आरोप करण्याची ही वेळ नाही,” असे सुनील म्हणाला.

राजकारण्यांवर नाराजी व्यक्त करत सुनील शेट्टी म्हणाला, “या लोकांना आपण निवडले आहे आणि त्यांच्यामुळे आपल्याला बेड्स, ऑक्सिजन आणि उपचारासाठी भटकावे लागत आहे. या लोकांनी आम्हाला निराधार केलं असून आम्हाला प्रत्येक गोष्ट मागावी लागत आहे.”

राजकारणात अद्यापही काही चांगले कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. अशा चांगल्या लोकांना निवडून द्या. तुमच्यासाठी कष्ट घेणा-यांना सत्तेत आणा, असे आवाहनही त्याने यावेळी केले.

“आपण सगळे कठीण परिस्थितीतून जात आहोत आणि या कठीण काळात आपण एकमेकांना पाठिंबा देण्याची गरज आहे. मी जेव्हा पण मदत मागितली तेव्हा मला कोणी नकार दिला नाही आणि हे यासाठी आहे कारण लोकांना एकमेकांची मदत करायची आहे.” असंही सुनीलनं म्हटलं.

दरम्यान, संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

 

महत्वाच्या बातम्या – 

फेसबुकवरील मैत्री आली अंगलट! पुण्यातील तरूणीवर मित्रांणीच…

‘हे माझ्या बापाचं घर आहे’ असं म्हणणाऱ्या नातवाची…

पाठलाग करणं आलं अंगाशी; गेंड्याने रागात असं काही केलं की…

चक्क चिमणीने केला सापावर हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

कोरोना काळात वास न येणं आणि तोंडाची चव जाणं चांगलं लक्षण,…