अमरावतीत राडा! शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरून राजकारण तापलं

अमरावती | आज सकाळी अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा हटवण्यात आला. महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्यानं आता अमरावतीतील वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळतंय.

आमदार रवी राणा यांनी हा पुतळा उभारला होता. मात्र, यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे अमरावती मनपा आणि पोलीस प्रशासनानं हा पुतळा हटवला.

विनापरवाना पुतळा उभारण्यात आल्यानं पोलिसांनी मोठ्या पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटला आहे. त्यानंतर रवी राणा आणि खासदार नवनीत राणा चांगल्याच आक्रमक झाल्याचं दिसतंय.

पुतळा हटवल्यानंतर राणा समर्थकांनी एकच गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी या पुतळा हटवल्यानंतर जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात देखील घोषणाबाजी झाली.

त्यावेळी रवी राणा यांनी शिवसेेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. शिवसेना ही आता शिवसेना राहिली नसून ती आता काँग्रेससेना झाली आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली.

उद्धव ठाकरे आणि त्यांचं सरकार शिवप्रेमींची गळचेपी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एखाद्या अतिरेक्यासारखं आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं, असंही राणा म्हणाले.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अमरावतीचं राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता हा वाद चांगलाच चिघळणार असल्याचं दिसतंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

तब्बल 6 तास अभिजीत बिचुकलेनं KISSING केली?; सलमान खानने केली बोलती बंद

“दुधातील माशी प्रमाणे मित्रपक्षांनी बाजूला फेकलं” 

शॅाकिंग… राजीनामा विराट कोहलीचा; हादरा बसला रोहित शर्माला! 

शेतात रहायला गेलेल्या सलमानचं शेजाऱ्यासोबत भांडण, या कारणामुळे खटला दाखल 

‘धोका अजून टळलेला नाही, Omicron नंतर…’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा