ओमर अब्दुल्ला यांची सुटका करा; ‘या’ अभिनेत्री भाजपला आवाहन!

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्याच्या करणावरुन गेल्या महिन्याभरापासून नजरकैदेत असलेले नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचं अभिनेत्री पूजा बेदीनं समर्थन केलं आहे. त्यांची सुटका करा, असं आवाहनही पूजा बेदीनं भाजपला केलं आहे.

ओमर अब्दुल्ला यांना एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून कैदेत ठेवण्यात आलं आहे. ते माझे वर्गमित्र आहेत तसेच तीन पिढ्यांपासून आमच्या कुटुंबियांमध्ये मित्रत्वाचं नातं आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर त्यांच्या सुटकेचा विचार करावा, अशा आशयाचं ट्वीट पूजा बेदीने केलं आहे.

मला आशा आहे की सरकार लवकरात लवकर ओमर यांच्या सुटकेसाठी काहीतरी योजना बनवेल. कायमस्वरुपी त्यांना कैदेत ठेवले जाऊ शकत नाही. त्यामुळे सरकारला यावर काहीतरी उपाय शोधावाच लागेल, असंही पूजा म्हणाली आहे.

पूजा बेदी आणि ओमर अब्दुल्ला यांच्या कुटुंबांमध्ये मित्रत्वाचे नाते आहे. तसचं ते दोघे वर्गमित्रही आहेत. त्यामुळे पूजाने सरकारकडे अब्दुल्ला यांच्या सुटका करण्याची विनंती पूजाने केली असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, पूजाने पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्री अमित शहा आणि काही पत्रकारांना टॅग करुन सोमवारी हे ट्विट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-