मोठी बोतमी! पूजा चव्हाण प्रकरणात नवीन ट्वीस्ट, ‘या’ कारणाने वडिलांची पोलिस स्टेशनमध्ये धाव

मुंबई | टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणावरूण राजकीय वर्तुऴात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामागे संंजय राठोड यांचा हात असल्याचा आ.रोप सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षातील नेते करत आहेत.

पूजा चव्हाण प्रकरणात रोज काही न काही नवीन माहीती समोर येत आहे. नुकतंच पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी याप्रकरणी पूजाच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते. संजय राठोड यांनी पूजाच्या कुटुंबियांना 5 कोटी रुपये दिल्याचा आरोप शांताबाई यांनी केला होता.

शांताबाई राठोड यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता पूजाचे वडिल लहू चव्हाण यांनी पो.लीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. शांताबाई राठोड यांच्या विरोधात लहू चव्हाण यांनी त.क्रार दाखल केली आहे. लहू चव्हाण यांनी परळी शहर पो.लिसांत ही त.क्रार दाखल केली आहे.

हे प्रकरण मिटवण्यासाठी मी ५ कोटी रुपये घेतल्याचा खोटा आरोप शांताबाई चव्हाण यांनी आपल्यावर केल्याचं पूजाच्या वडिलांनी आपल्या त.क्रारीत म्हटलं आहे. तसेच शांताबाईंनी माझी ब.दनामी केल्यामुळे मी ही त.क्रार दाखल करत असल्याचं देखील लहू चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण टीकटॉकमुऴे प्रकाशझोतात आली होती. ती मूऴ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील होती. पुणेे येथे ती वानवडी भागात इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती.

८ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणने इमारतीतून उ.डी घेऊन आत्मह.त्या केली. प्रथमदर्शनी तिने त.णावातूऩ आ.त्मह.त्या केल्याचं बोललं जात होतं. मात्र, या प्रकरणाच्या 12 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आणि राजकीय वर्तुऴात एकंच खळबळ उडाली.

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्मह.त्या प्रकरणावरूण आता संजय राठोड यांच्या भोवती सं.शयाची सुई निर्माण झाली आहे. वि.रोधी पक्षातील नेते या प्रकरणावरूण चांगलेच आ.क्रमक झाले आहेत. या प्रकरणी आता पुढे काय होतंय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘सुशांत गेला यात माझी काय चूक आहे’; संतापलेल्या अंकिताचं ट्रोलर्सला सणसणीत उत्तर! पाहा व्हिडीओ

“भावा माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे माझ्या बापालाच जाऊन विचार”

अखेर पूजा चव्हाणचा पोस्टमॉ.र्टम रिपोर्ट आला समोर; मृ.त्युचं धक्कादायक कारण उघड!

कॅटवॉक करणारी गाई तुम्ही पाहिली आहे का? गाईचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल!

‘मला डुक्कराच्या बड्डेला जायचंय’; चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ