‘माझी बहिण वाघिण होती पण…’; पूजा चव्हाणच्या बहिणीची भावूक पोस्ट व्हायरल

पूजा चव्हाण सू.साईड प्रकरणात अनेक वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहे. या सू.साईड प्रकरणाची चक्र सध्या महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याभोवती फिरत आहे. या तरुणीच्या प्रकरणात कथित मंत्री आणि कार्यकर्त्याच्या संभाषणाच्या क्लिप समोर आल्या आहेत. यातच आता पूजाच्या बहिणीनं तिची बाजू घेत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमधून तिने माझी बहिण वाघिण होती. ती असं करु शकत नाही. आणि जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये कुठलं तरी मोठं कारण असेल असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पूजाच्या बहिणीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, मी दोन दिवसांपासून मी पाहात आहे की तुम्ही काही ही पोस्ट टाकत आहात. काही विचारपूस न करता, माझी बहीण फक्त परळी वैजनाथची नाहीतर पूर्ण महाराष्ट्राची वाघिण होती. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की ती असं काही करेल आणि हे तुम्हालापण चांगलंपणे माहिती आहे. असं पूजाची बहिण दिया चव्हाणनं लिहिलं आहे.

पुढे तिनं लिहिलं, मला आजसुद्धा विश्वास होत नाही तिने सु.साईड केलं आहे आणि जरी केलं असेल तर मोठीच कोणती तरी गोष्ट असेन. दीदीने नेहमी सर्वांना मदत केली आहे. काही विचार न करता तिने फक्त बंजारा समाज नाहीतर सर्वांना पाठिंबा दिला आहे. जेवढं होईल तेवढं तिने मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.

मी तिची छोटी बहीण आहे हे माझं नशीब आहे. ती आज आपल्या सोबत नाही याचं तुम्हाला एवढं दु:ख होत असेल, तर विचार करा आम्ही कसा स्वत:ला सांभाळत आहोत. मला आधीच याचा त्रास सहन होत नाही. आई वडिलांना सांभाळायचं आहे अजून. आणि तुम्ही अशा पोस्ट टाकत आहात. निदान तिला ज.स्टिस मिळू शकत नाही तर अशा पोस्ट करुन आम्हाला त्रास तर देऊ नका. तिला स्वर्गामध्ये शांतीने राहू द्या , ती जर हे सर्व पाहात असेल तर तिला किती त्रास होत असेल विचार करा. अशी भावनिक पोस्ट पूजाची बहिण दिया चव्हाणनं सोशल मीडियावर शेअर केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक ! ‘या’ कारणामुळे त्याने सांडपाण्याच्या नळीत लपवलं 21 लाखांचे सोनं!

पूजा चव्हाण प्रकरण: मुसक्या आवळायच्या तर वाट कसली बघताय?- चित्रा वाघ

जाणून घ्या शरीरासाठी गुणकारी असणाऱ्या काळ्या तांदळाविषयी, ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

सोन्याचा आजचा भाव, 9,000 रुपयांनी सोनं स्वस्त, वाचा ताजे दर

पेट्रोलशिवाय चालणाऱ्या ‘या’ गाड्या लवकरच येणार बाजारात