रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंची पूनम पांडेकडून प्रशंसा, म्हणाली…

मुंबई | बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रणवीरने नुकतंच पेपर मॅगझीनसाठी एक न्यूड फोटोशूट केलं आहे.

रणवीर सिंगच्या या न्यूड फोटोंची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. काहिंनी रणवीरच्या या फोटोशूटचं कौतुक केलं आहे तर काहिंनी मात्र रणवीरला चांगलंच ट्रोल केलं आहे.

रणवीरचं न्यूड फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत असताना रणवीरच्या न्यूड फोटोंवर आता पूनम पांडेने प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरने मला माझ्याच गेममध्ये हरवलं असल्याची प्रतिक्रिया पूनम पांडेने दिली आहे.

पूनम पांडेने रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटमधील काही फोटो ट्विट केले आहेत. सोबतच तू मला माझ्याच खेळात हरवलं, असंही पूनम पांडे म्हणाली.

रणवीरच्या न्यूड फोटोंवर कमेंटचा अक्षरश: पाऊस पडत आहे. अनेकांनी कमेंट करत रणवीरला ट्रोल देखील केलं आहे.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, रणवीरचे न्यूड फोटोशूट रणवीरची पत्नी व अभिनेत्री दीपिका पादुकोनच्या पसंतीस उतरले आहे. पेपर मॅगझीनकडून हे फोटो प्रदर्शित होण्यापूर्वीच तिने हे पाहिल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, रणवीर सिंग त्याच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमी लाईमलाईटमध्ये असतो. मात्र, न्यूज फोटोशूट करत रणवीरने चाहत्यांसह सर्वांनाच धक्का दिला.

 

महत्त्वाच्या बातम्या-

“शिवसेना फुटल्याचं फुकटचं श्रेय फडणवीसांनी घेऊ नये, ते श्रेय उद्धव ठाकरेंचच”

उरल्या सुरल्यांचं काय ऐकायचं म्हणत नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले…

“उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही”

“मनावर दगड ठेवून आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं”