Poonam Pandey Death l सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचे आकस्मिक निधन झाले आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे (cervical cancer) पूनम पांडेचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान एकीकडे पूनम पांडेच्या अचानक मृत्यूमुळे (Death) शोक व्यक्त होत असून, दुसरीकडे तिच्यात अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करण्यात आल्याने चाहते शंका देखील उपस्थित करत आहेत. (Poonam Pandey Death)
पूनमच्या चाहत्यांना धक्का! :
वादग्रस्त पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी पूनमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. पूनम पांडे केवळ 32 वर्षांची होती.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील निवासस्थानी पूनमने अखेरचा श्वास घेतला आहे. यासंदर्भात पूनमच्या मॅनेजरने झूमशी संवाद साधताना तिचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असल्याचे समोर आले आहे. (Poonam Pandey Death)
Poonam Pandey Death l पूनमच्या निधनाची महिती इन्स्टाग्राम अकाउंटवर केली शेअर :
पूनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “आजची सकाळ आमच्यासाठी कठीण आहे. आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे आपण आपली लाडकी पूनम गमावली आहे. त्यांच्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती त्यांना प्रेमाने भेटली. या दुःखाच्या वेळी, आम्ही गोपनीयतेची विनंती करू. आम्ही शेअर केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही त्याची आठवण ठेवू.”(Poonam Pandey Death)
Poonam Pandey Death l पूनमने मृत्यूच्या 3 दिवस आधी गोव्याचा व्हिडिओ केला शेअर :
पूनमने मृत्यूच्या 3 दिवस आधी गोव्याचा व्हिडिओ केला शेअर केला आहे. पूनम पांडेने व्हिडिओ शेअर करत लिहिले, ‘गोरे आणि काळे, यिन आणि यांग जे माझ्या आयुष्यात संतुलन राखतात.’ व्हिडिओमध्ये पूनम पांडे कॅमेऱ्याकडे हसताना दिसत आहे. याच्या एक आठवड्यापूर्वी तिने काही फोटो शेअर केले होते. म्हणजे पूनम पांडेने तिच्या तब्येती किंवा आजाराबाबत कुठेही तिच्या चाहत्यांशी काहीही शेअर केली नाही. आणि आता गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी अचानक आली तेव्हा लोकांना धक्का बसला आहे.
News Title : Poonam Pandey Deat
महत्वाच्या बातम्या –
Vodafone Idea 5G l Vi वापरकर्त्यांना मिळणार 5G सेवा; जाणून घ्या कधी होणार सुरु
Abhishek Bachchan Daughter l अभिषेक बच्चनने त्याच्या मुलीची जबाबदारी या व्यक्तीवर टाकली
Share Market l शेअर बाजारात मोठी वाढ! पाहा आजच मार्केट कस असेल
Today Horoscope l आजचे राशिभविष्य; या राशीचे व्यक्ती राजकीय क्षेत्रात आघाडी घेतील
MS Dhoni ED l IPL 2024 पूर्वी MS धोनीला बसला मोठा धक्का; त्या कंपनीवर ED चा छापा