नवी दिल्ली | भारतीय डाक विभाग सातत्यानं नवीन योजना घेऊन येत आहे. या योजनांच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस ग्राहकांना आकर्षक सुविधा देतं.
पोस्ट ऑफिस विभागात नोकरीला लागणाऱ्यांचं देखील प्रमाण चांगलं आहे. केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेला हा विभाग चांगला पगार असणाऱ्या नोकऱ्या देतो. अशात इंडिया पोस्टमध्ये नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मेल मोटर सर्व्हिस विभागांतर्गत स्टाफ कार ड्रायव्हर (इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट 2022) च्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 17 मेपर्यंत वेळ आहे. मदुराईमध्ये ही भरती होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेला नाही. ते इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे आहे.
याशिवाय, उमेदवार थेट https://www.indiapost.gov.in/vas/Pages/India या लिंकद्वारे या पदांसाठी (इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट 2022) अर्ज करू शकतात.
तुम्ही https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP_12012022 या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना (इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट 2022) तपासू शकता. या भरती (इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट 2022) अंतर्गत एकूण 4 पदे भरली जातील.
उमेदवाराचं वय 18-56 यामध्ये असायला हवं. या पदासाठी निवडलेल्या गेलेल्या उमेदवारांना 19,900- 63,200 ग्रेड-2 वेतनश्रेणी लागू असणार आहे. परिणामी आवेदनपत्र सादर करण्याचं आवाहन पोस्ट विभागाकडून करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
The Kashmir Flies चा मोठा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ कोटींची केली कमाई
मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका
“कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”
देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…
“दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”