पोस्टाची बंपर योजना; 10 हजारांची बचत करुन ‘इतके’ लाख मिळवा

मुंबई | पोस्ट ऑफिस योजना ज्यांना त्यांच्या पैशातून धोका पत्करायचा नाही त्यांच्यासाठी एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिस अनेक बचत योजना चालवते आणि सरकार त्यावर उत्तम परताव्याची हमी देते. पोस्ट ऑफिस योजनेत तुमचे पैसे 100% सुरक्षित आहेत.

पोस्ट ऑफिस स्कीममध्येही तुम्हाला चांगले रिटर्न मिळतात. पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजना अधिक चांगल्या आहेत. यामध्ये कमी खर्चात गुंतवणूक केल्यास मोठी कमाई होते.

या योजनेद्वारे, तुम्ही अगदी कमी पैशात गुंतवणूक सुरू करू शकता. याशिवाय तुमचे पैसेही पूर्णपणे सुरक्षित राहतील. यामध्ये तुम्ही दरमहा 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता.

तुम्ही किती गुंतवणूक करू शकता याची कमाल मर्यादा नाही. पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट खाते ही चांगली व्याजदरासह लहान हप्ते जमा करण्याची सरकारी हमी योजना आहे.

जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये सलग दहा वर्षे दरमहा 10 हजार रुपये गुंतवले, तर योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला 16,26,476 लाख रुपये मिळतील. जर तुम्ही आरडीचा हप्ता वेळेवर जमा केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

हप्ता भरण्यास उशीर झाल्यास, तुम्हाला दरमहा एक टक्का दंड भरावा लागेल. यासोबतच तुम्ही सलग चार हप्ते जमा न केल्यास तुमचे खाते बंद केले जाईल.

पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेले आरडी खाते पाच वर्षांसाठी असते. प्रत्येक तिमाहीत जमा केलेल्या पैशावर व्याज मोजले जाते. मग ते प्रत्येक तिमाहीच्या शेवटी चक्रवाढ व्याजासह तुमच्या खात्यात जोडले जाते.

इंडिया पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, सध्या आरडी स्कीमवर 5.8 टक्के व्याज दिले जात आहे. केंद्र सरकार त्यांच्या सर्व लहान बचत योजनांमध्ये दर तिमाहीला व्याजदर जाहीर करते.

महत्त्वाच्या बातम्या-

‘…हे आधी तुम्ही सिद्ध करा’; मुंबई उच्च न्यायालयाचा ज्ञानदेव वानखेडेंना झटका

“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात” 

“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली” 

मुख्यमंत्र्यांकडून नवाब मलिकांचं कौतुक, म्हणाले…’गुड गोईंग’ 

‘पद्म पुरस्कारासाठी मी लायक नाही’; आनंद महिंद्रा यांचं वक्तव्य चर्चेत