मुंबई | आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. अनेकदा पैशांची टंचाई देखील जाणवू लागते. त्यामुळे आर्थिक नियोजन असणं महत्त्वाचं ठरतं. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना असतात त्यामुळे आपलं पुढील आयुष्य सुखकर जाऊ शकतं. अशीच एक योजना पोस्टानं आता आणली आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहक मुलाच्या नावे योजनेत सहभागी होत असतो. एमआयएस ही पोस्टाची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेत 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावे खाते उघडता येते.
या योजनेत दरमहा 2500 हजार रुपयांशिवाय कर्जासह इतरही अनेक सुविधा मिळतात. मुलाच्या भविष्यासाठी या योजनेत भाग घेणाऱ्यांना दरमहा शिक्षणासाठी उपयोगी येईल इतकी रक्कम मिळते.
योजना सुरू झाल्याच्या तारखेपासून जर तुम्ही 2 लाख रूपये जमा केले तर तुम्हाला दरमहिना 6.6 टक्के व्याजदरानं 1100 रूपये मिळणार आहेत. त्यानंतर योजनेचा कालावधी पाच वर्षाचा असेल तो संपताना तुम्हाला 2 लाख रूपये परत मिळणार आहेत.
मुलाच्या वयानुसार ही योजना प्रभावी ठरत आहे. मुलाच्या दरमहा खर्चासाठी योग्य रक्कम मिळत असल्यानं या योजनेची विश्वासार्हता वाढली आहे. एमआयएस योजना एकल किंवा तीन व्यक्ती एकत्रितपणे खात उघडू शकतात.
दहावर्षाच्या मुलासाठी तुम्ही पहिल्यांदा 3.5 लाख रूपये या योजनेत गुंतवल्यास तुम्हाला दरमहा 1925 रूपये मिळणार आहेत. तर 4.5 लाख रूपये भरल्यास तुम्हाला 2475 रूपये मिळणार आहेत.
सध्या ग्रामीण भागात या योजनेला अधिक प्रमाणात पसंती मिळत आहे. ग्रामिण भागात शिक्षणासाठी मुलांच्या पालकांना दरमहा काही रक्कम लागत असल्यानं अशी रक्कम या योजनेतून मिळणार आहे.
दरम्यान, पोस्ट ऑफिस सातत्यानं नवीन योजना घेवून ग्राहकांना फायदा पोहोचवण्याचं काम करत आहे. अशात आता एमआयएस या योजनेमध्ये सहभागी होण्याऱ्या ग्राहकांना विविध फायदे होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
मोठी बातमी! रशियाविरोधात अमेरिका आक्रमक; उचललं मोठं पाऊल
“चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं”
पुतिन यांचा अमेरिकेला झटका; घेतला हा मोठा निर्णय
रशिया-यूक्रेन युद्धाचा मोठा फटका; सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला