मुंबई | भारतीय डाक विभाग (Post Office) सातत्यानं नवीन योजना घेऊन येत आहे. त्याचा ग्राहकांना लाभ देखील होत असतो. परिणामी पोस्टाच्या योजनांचा लाभ मिळवणारे अनेकजण आहेत. अशात एक योजना सध्या चर्चेत आहे.
पोस्ट ऑफिस योजना अशा लोकांसाठी फायदेशीर आहेत ज्यांना शून्य जोखमेसह नफा हवा आहे. पोस्ट ऑफिस MIS ही अशीच एक बचत योजना आहे. ज्यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक करून दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात नफा मिळवू शकता.
पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम अनेक फायदे आहेत. हे खाते 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावानेही उघडता येते. त्यामुळे मुलांच्या भविष्यासाठी ही योजना अत्यंत लाभदायक असल्याचं पहायला मिळतंय.
तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने हे विशेष खाते (पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना) उघडल्यास, तुम्हाला दर महिन्याला मिळणाऱ्या व्याजासाठी तुम्ही शिक्षण शुल्क भरू शकता.
या योजने अंतर्गत किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये जमा करता येतील. सध्या या योजनेअंतर्गत व्याज दर 6.6 टक्के आहे.
जर मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही हे खातं त्याच्या नावाने उघडू शकता आणि जर ते कमी असेल तर त्याऐवजी पालक हे खाते उघडू शकतात.
दरम्यान, जर तुम्ही या खात्यात 3.50 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला सध्याच्या दरानुसार दरमहा 1925 रुपये मिळतील. शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी ही मोठी रक्कम आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
MIMच्या प्रस्तावावर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
भारतात कोरोनाची आणखी एक लाट येणार?; WHO ने दिला भारताला गंभीर इशारा
होळीच्या दिवशी भर रस्त्यात घडली धक्कादायक घटना; पाहा धडकी भरवणारा व्हिडीओ
“तुम्ही ठरवलं तर माझा पहिला नंबर येतोच, 3 मार्कशीट जूळवून पहिले आले, आता…”
नवनीत राणांवर चढला पुष्पाचा फिवर! म्हणाल्या, “नवनीत नाम सुनके…”; पाहा व्हिडीओ