Top news देश राजकारण

“प्रभू श्रीराम हे दशरथाचे पुत्र नाहीत, ते तर…”

nishad e1636478707684
Photo Credit- Facebook/ DrSanjay Kumar Nishad

लखनऊ | आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमुळे उत्तर प्रदेशातील राजकारण तापलं आहे. भाजपने निवडणुकीच्या तयारीकरिता कंबर कसली आहे. त्यातच आता भाजप सहकारी निषाद पक्षाचे अध्यक्ष डॉ. संजय निषाद यांनी श्रीराम यांच्याबद्दल अजब वक्तव्य केलं आहे.

प्रभू श्रीराम हे राजा दशरथ यांचे पुत्र नव्हते. तर पुत्र कामेष्टी यज्ञ करणारे ऋषी श्रृंगी यांचे सुपुत्र होते, असं वक्तव्य संजय निषाद यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

‘राजा दशरथ यांनी प्रभू श्रीराम यांचे तथाकथित पुत्र म्हटले जाऊ शकते. मात्र, ते त्यांचे खरे वडिल नव्हते’, असं म्हणत निषाद यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. संजय निषाद यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता.

आपलं वक्तव्य चुकीचं आहे, हे लक्षात आल्यानंतर डॉ.संजय निषाद यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र उत्तर प्रदेशातील संत- महंतांनी संजय निषाद यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

संजय निषाद म्हणाले होते की, राजा दशरथ यांना मुल होत नव्हते. त्यावेळेस त्यांनी ऋषी श्रृंगी यांच्याकडून यज्ञ करून घेतला. हा यज्ञ फक्त सांगण्यापुरता होता, असं वादग्रस्त वक्तव्य निषाद यांनी केलं आहे.

ऋषी श्रृंगी यांनी दिलेल्या खीरमुळे राजा दशरथ यांच्या तिन्ही पत्नींना पुत्ररत्नाचा लाभ झाला, असे म्हटले जाते. खीर खाल्यामुळे कोणत्याही स्त्रीची गर्भधारणा होऊ शकत नाही, असंही वक्तव्य निषाद यांनी केलं आहे.

राजा दशरथ आणि त्यांच्यासोबत असणारे मंडळी प्रभु राम यांना राजकुमार समजत होते. प्रभू राम यांच्या रूपाने ईश्वर स्वत: अवतरले आहेत हे कोणालाही माहित नव्हते.

राम हे ईश्वर आहेत हे समजण्याची क्षमता फक्त निषाद राजामध्ये होती. जो ईश्वराला ओळखू शकतो तो ईश्वरापेक्षा मोठा असतो, असंही संजय निषाद यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संजय निषाद यांनी केलेल्या वक्तव्यामुळे साधु-संतांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संजय निषाद यांचे वक्तव्य निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  तसेच चर्चेत राहण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे, असंही साधु-संतांनी म्हटलं आहे.

यावर संजय निषाद यांना विचारले असता आपले वक्तव्य चुकीच्या अर्थाने मांडले जात आहे. आपण प्रभू राम यांचे गुण आणि महानता यांचं वर्णन करत होतो, असं स्पष्टीकरण संजय निषाद यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 
“इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचं कीर्तन होऊ देऊ नका”

कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूचं सावट! युरोपातील अनेक देशात चिंतेचं वातावरण

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं! राज्यभरातील 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

रोहित शर्मा भारताचा नवा कर्णधार; आयपीएलमध्ये झळकलेल्या ‘या’ चार युवा खेळाडूंची संघात वर्णी

बहुप्रतिक्षित ‘Maruti Suzuki Celerio’ उद्या बाजारात धडकणार; जाणून घ्या किंमत