पोलीस इन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा ससून रुग्णालयात दाखल

पुणे | पोलीस चकमक फेम अधिकारी प्रदीप शर्मा (Encounter Specialist Pradeep Sharma) हे मुंबईतील आर्थर रोड (Arthur Road) कारागृहात होते. त्यांना तिथून पुण्याच्या येरवडा कारागृहात हलविण्यात आले होते.

आता त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले आहे. उद्योगपती मुकेश अंबाणी (Mukesh Ambani) यांच्या कुलाब्याच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याच्या आरोपाखाली त्यांना गतवर्षी अटक करण्यात आली होती.

सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना मुंबईहून पुण्याला आणले गेले होते. येरवडा कारागृहात त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना तात्काळ ससून रुग्णालयात (Sassoon Hospital, Pune)हलविण्यात आले.

त्यांच्यावर तेथे प्राथमिक उपचार केले गेले आहेत. उपचारानंतर त्यांना पुन्हा कारागृहात नेले असता, त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि त्यांना परत रुग्णालयात आणले गेले. त्यांच्यावर वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. आता त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, मुकेश अंबाणी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके सापडल्याचे प्रकरण दोन वर्षांपूर्वी उघडकीस आले. त्यानंतर काही काळाने व्यावसायीक मनसुख हिरेन यांची हत्या झाली होती.

याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) आणि प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना अटक केली होती. नालासोपारा मतदारसंघातून शर्मा यांनी शिवसेनेतून विधानसभेची निवडणूक लढविली होती.

महत्वाच्या बातम्या – 

जय शहा यांच्या तिरंगा नाकारण्यावर प्रकाश राज आक्रमक; ट्विट करत म्हणाले,

भाजप – मनसे युती होणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य

“एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे उत्तराधिकारी आणि सनातन धर्माचे…” बाबा रामदेव यांचे मोठे वक्तव्य

पूर आणि भीषण महागाईमुळे पाकिस्तान आला ताळ्यावर; भारताकडे केल्या ‘या’ मागण्या

शिवसेनेच्या ‘दसरा मेळाव्या’वरुन राज ठाकरे यांचे ट्विट चर्चेत