दूरदर्शनवरील बातम्यांचा आवाज हरपला, ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन

मुंबई | दूरदर्शनवरील वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचं निधन झालं आहे. भिडे यांचं मुंबईत निधन झाल्याची माहिती डीडी सह्याद्रीकडून ट्विटरवर देण्यात आली आहे.

प्रदिप भिडे यांनी ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात काही काळ जनसपर्क अधिकारी म्हणून काम केलं. त्यानंतर ते मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये वृत्तनिवेदक म्हणून नोकरीला लागले.

विज्ञान शाखेमधून शिक्षण घेतल्यानंतर प्रदिप भिडे यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतली होती. प्रदिप भिडे यांनी आतापर्यंत सुमारे दीड ते दोन हजार कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदन केलं आहे.

दरम्यान, ऑल इंडिया रेडिओ पुणे तसेच सह्याद्री बातम्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन भिडे यांच्या निधनासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘तारक मेहता’ मालिकेच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! 

रेल्वेने भंगार विकून मिळवले ‘इतके’ कोटी; आकडा वाचून थक्क व्हाल 

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, आता अरुण गवळीचं कनेक्शन समोर 

Monsoon Update | येत्या 2 दिवसांत ‘या’ सहा जिल्ह्यांना पाऊस झोडपणार 

महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी!