भाजप खासदाराला आला मुलीचा ‘न्यूड व्हिडीओ काॅल’ अन्…

नवी दिल्ली | चक्क एका महिला खासदाराला ब्लॅकमेल केल्याचं प्रकरण सध्या गाजत आहे. भाजप खासदार आणि चर्चित व्यक्तिमत्त्व प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मध्यरात्री काही आक्षेपार्ह मजकूर पाठवल्यानं सध्या खळबळ माजली आहे.

भाजपच्या भोपाळ मतदारसंघाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या सध्या कोरोना पाॅझिटीव्ह आल्यानं आपल्या घरीच आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली होती.

खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना रविवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजता एका अज्ञात मुलीचा व्हिडीओ काॅल आला होता. त्या व्हिडीओ काॅलमध्ये तरूणी नग्न अवस्थेत होती. घडलेल्या प्रकारानंतर ठाकूर यांनी पोलिसांकडं तक्रार केली आहे.

रविवारी सायंकाळी दोन अनोळखी क्रमांकावरून ठाकूर यांना अश्लिल फोटो आणि मेसेज पाठवण्यात आले होते. पोलिसांनी अज्ञात फोन क्रमांकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. सायबर सेलमार्फत चौकशी चालू आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर या सत्ताधारी भाजपच्या एक महत्त्वाच्या खासदार म्हणून सर्वपरिचीत आहेत. आपल्या खास वक्तव्यांनी त्यांंनी देशात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशातच त्यांच्यासोबत असा गैरप्रकार झाल्यानं पोलीस सतर्क झाले आहेत.

अश्लिल मॅसेज आणि फोटोज आपल्या मोबाईल क्रमांकावर आल्यानंतर खासदार ठाकूर यांनी मध्यरात्री 2 वाजता पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि चौकशीला सुरूवात केली आहे.

खासदार प्रज्ञा ठाकूर यांना यापूर्वीही अशाप्रकारचे न्यूड व्हिडीओ आणि मॅसेज पाठवण्यात आले होते. याप्रकरणात पोलिसांकडं तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणात काय तथ्य समोर येतात हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, प्रज्ञा सिंह यांना काॅल करणाऱ्या मुुलीनं काॅल उचलताच आपले कपडे काढायला सुरूवात केल्यानं ठाकूर यांनी लगेच फोन कट केला. सध्या हे प्रकरण प्रचंड गाजत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 निळी साडी अन् लाल ब्लाऊज… राजेश्वरी खरातचा ‘हा’ हॅाट डान्स तुफान व्हायरल!

“तुमची हिम्मत कशी झाली?”; लतादीदींसाठी बाळासाहेबांनी थेट गुलशन कुमारांना झापलं

 ओमिक्राॅनमुळे ‘या’ लोकांचा होतोय मृत्यू, ICMRच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

मोठी बातमी! नितेश राणेंची तब्येत पुन्हा बिघडली, तातडीने कोल्हापूरला हलवलं

“एक हजार पाकिस्तानही लता दीदींच्या जाण्याचं नुकसान भरून काढून शकत नाही”