मशिदींमध्ये होणाऱ्या अजानवर प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा आक्षेप, म्हणाल्या…

भोपाळ | चार वर्षापूर्वी प्रसिद्ध गायक सोनू निगम याने एक ट्विट केलं. सोनू निगमच्या या ट्विटमुळे देशातील राजकारण पेटून उठलं होतं. तर अनेकांनी सोनू निगमच्या ट्विटचं कौतुक देखील केलं होतं.

मी मुस्लीम नाही तरी देखील मला रोज सकाळी अजानमुळे उठावं लागतंय, असं सोनू निगम म्हणाला होता. भारतातील ही सक्तीची धार्मिकता कधी थांबणार?, असा सवाल देखील सोनू निगमने उपस्थित केला होता.

मुस्लीम धर्माचा ज्यावेळी शोध लागला त्यावेळी वीज नव्हती, मग एडिसनने कर्कश आवाजाचा शोध लावला का?, असा खोचक सवाल देखील त्यावेळी सोनू निगमने उपस्थित केला होता.

सोनू निगमच्या या ट्विटनंतर देशातील राजकारण तापल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता हेच प्रकरण पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एक वक्तव्य केल्यानं आता वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

पहाटे अजानमुळे लोकांची झोप मोड होते. रुग्णांचा देखील हे लोक विचार करत नाहीत आणि साधू-संतांच्या साधनेत यामुळे भंग होतो, असं साध्वी प्रज्ञा म्हणाल्या आहेत.

इतर समुदाय ज्यावेळी प्रार्थना करतो, त्यावेळी मोठ्या आवाजात भजन, मोठ्या आवाजात कीर्तन करु नका असं आपल्याला सांगितलं जातं. पण हे लोक पहाटे पहाटे अजान करुन लोकांची झोप मोड करतात, असंही प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या आहेत.

साधू संतांच्या आरतीची वेळ सकाळी असते. त्यावेळी ही लोकं मोठ मोठे भोंगे लावून आरतीत व्यथ्य आणतात. त्यांचा त्रास होतो, असंही साध्वी प्रज्ञा म्हणाल्या आहेत.

आम्ही हिंदू लोकं सर्वधर्म समभावाचा स्विकार करतो. मात्र, इतर कोणता धर्म असं वागतो का?, असा सवाल देखईल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

कुटुंबातील एका मुलाला राजकारण जमत नाही म्हणून ते आपल्या मुलीला राजकारणात आणत आहेत, असं म्हणत साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गांधी कुटुंबीयांवर देखील हल्लाबोल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कपचा वचपा काढण्यासाठी न्यूझीलंड सज्ज; सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरूद्ध निर्णायक लढत

“…आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीये”

 नवाब मलिक यांनी अखेर हायड्रोजन बाॅम्ब फोडला; देवेंद्र फडणवीसांवर केले गंभीर आरोप

मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही- रावसाहेब दानवे

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी