भोपाळ | भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहेत.
कोरोना काळात अनेकदा साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती. गोमूत्र म्हणजे अँटीबायोटिक असल्याचं प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं होतं.
गोमूत्र आपण पवित्र मानतो. गोमूत्र सेवन केल्यानं अनेक संसर्गजन्य आजार बरे होतात, असं साध्वी म्हणाल्या होत्या.
याशिवाय अनेक संशोधकांनीही म्हटलं आहे की, गोमूत्र म्हणजे अँटीबायोटिक आहे, असा दावा साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला होता.
अशातच आता साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करत दिली आहे. आज माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचं त्यांनी म्हटलंय.
मी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. 2 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, त्यांनी सतर्क राहावे आणि गरज पडल्यास कोरोना चाचणी देखील करून घ्यावी, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, देव त्यांना लवकर आशीर्वाद देवो. त्यांनी सांगितलेले उपाय त्यांनी स्वतः वापरले नाहीत असं दिसतंय, असं म्हणत काँग्रेसने साध्वी ठाकूर यांना चिमटा काढला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हुडहुडी वाढणार! उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा गारठण्याची शक्यता
“…तर उद्धव ठाकरे आणि अजित पवारांसमोर मी स्वत: दुकानं फोडणार”
परमबीर सिंह प्रकरणात सर्वात मोठा खुलासा, अंडरवर्ल्ड डाॅन छोटा शकीलचं नाव घेतलं
अण्णा हजारे ठाकरे सरकारवर बरसले, म्हणाले…
“महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, पुढचे 25 -30 वर्ष तरी…”